Download App

नगरकरांमध्ये निवडणुकीचा निकाल फिरवण्याची ताकद; मोदींच्या सभेतील गर्दीने लंकेंना टेन्शन

नगरमधील सभेला संबोधित करण्यासाठी उभ्या राहिलेल्या मोदींनी नेहमीप्रमाणे त्यांच्या भाषणाची सुरूवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी अभिवादन करत मराठीतून केली

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : नगरकरांमध्ये लोकसभा निवडणुकांचा निकाल फिरवण्याची ताकद असून, शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आणि नगरचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना मिळणारं प्रत्येक मत केंद्रात नरेंद्र मोदींना (Narendra Modi) अधिक मजबूत करेल. त्यामुळे नगरकरांनी अधिकाधिक मतदान करणे गरजेचे असून, याआधीच्या निवडणुकांचे सर्व रेकॉर्ड मोडून काढावे असे म्हणत तुम्ही जर पोलिंग बूथ जिंकले तर मी अगदीसहजतेने सर्व लोकसभा जिंकेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. नगरकरांमध्ये सर्व बूथ जिंकवून देण्याची ताकद आहे असल्याचेही ते म्हणाले. मात्र, दुसरीकडे मोदींच्या नगरमधील सभेत विराट संख्येने नागरिक उपस्थित असल्याने सुजय विखेंच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या निलेश लंकेच्या (Nilesh Lanke) मनात धाकधूक वाढली आहे.  ते अहमतनगर येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. (Narendra Modi Speech In Ahmednagar Rally)

मतपेट्या उघडतील तेव्हा ना पंतप्रधान बदलणार, ना अहिल्यानगरचा खासदार; खा. विखेंना विश्वास

भाषणाची सुरूवात नेहमीप्रमाणे मराठीतून

नगरमधील सभेला संबोधित करण्यासाठी उभ्या राहिलेल्या मोदींनी नेहमीप्रमाणे त्यांच्या भाषणाची सुरूवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी अभिवादन करत मराठीतून केली. अहिल्यानगर भूमिला मी अभिवादन करतो असे ते म्हणाले. देशाचा तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू असून, भाजप आणि मोदींविरोधात उभ्या ठाकलेल्या इंडी आघाडीची एक्सपायरी डेट 4 जून असल्याचे मोदींनी सांगून टाकले. यावेळी मोदींनी काँग्रेसवर जरदार हल्लाबोल चढवला.

माझ्या जन्मापूर्वी निर्माण झालेला निळवंडे धरणाचा प्रश्न मोदींनी सोडवला -देवेंद्र फडणवीस

काँग्रेसने 50 वर्ष खोटी आश्वासने दिली

काँग्रेसवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, काँग्रेसने आपला जाहीरनामा पूर्णपणे मुस्लिम बनवला आहे. काँग्रेसकडे बोलण्यासाठी काहीच मुद्दे राहिलेले नसून, 50 वर्ष काँग्रेसने ऱक्त गरिबी हटवण्याचे खोटी आश्वासन दिल्याचे मोदी म्हणाले. तुमचं एक मत थेट मोदींच्या खात्यात जाणार आहे. त्यामुळे विचार करून मतदान करा असे आवाहन मोदींनी मतदारांना केले. देशात आणखीन विकास होणार असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचं सरकार अनेक योजना आणत असल्याचेही मोदी म्हणाले.

काँग्रेसकडून दहशतवाद्यांना निर्दोष असल्याचे सर्टिफिकेट; वडेट्टीवारांच्या कसाबच्या विधानावर मोदींची खडसून टीका

मोदींच्या सभेला तोबा गर्दी लंकेच्या पोटात गोळा

अहमदनगरमधून भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील विरूद्ध मविआचे निलेश लंके यांच्या थेट लढत होत आहे. नुकतीच निलेश लंकेसाठी शरद पवारांनी प्रचार सभा घेतली होती. मात्र, त्या सभेच्या तुलनेत आजच्या मोदींच्या सभेला विराट जनसुमदाय उपस्थित होता. त्यामुळे सुजय विखेंच्या विरोधात मैदानात उतरलेल्या निलेश लंकेंच्या पोटात भीतीचा गोळा आला असून, नगरचे मतदार विजयाची माळ विखेंच्या की लंकेच्या गळ्यात टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, मोदींच्या सभेला आलेली गर्दी बघता विखेंचा विजय निश्चित मानला जात आहे.

follow us