Download App

Maharashtra political Crisis : सत्तासंर्षाच्या निकाला दरम्यान नरहरी झिरवळ नॉटरिचेबल!

Narhari Zirwal Not Reachable : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud)निकालपत्राचे वाचन करणार आहेत.

Shivsena : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येणार? शिंदे, ठाकरे गटाची धाकधूक वाढली…

मात्र या दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे राज्याच्या विधान सभेचे उपसभापती नरहरी झिरवळ नॉटरिचेबल झाले आहेत. त्यांचे दोन्ही फोन बंद झाले आहेत. तर ते गावाकडच्या घरी देखील नसल्याचं सांगण्यात येत आहे. सत्तासंघर्षाच्या निकालाच्या दिवशी विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष झिरवळ ‘नॉट रिचेबल’ त्यामुळे राज्याच्या राजकारणात सत्तासंर्षाच्या निकाला दरम्यान आणखी काय खळबळजनक घटना घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान सत्तासंघर्ष हा विधीमंडळातील मुद्दा असल्याने सर्वोच्च न्यायालय याचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा असा निकाल देऊ शकत. त्यामुळे तेव्हा जे अध्यक्ष होते ते म्हणजे नरहरी झिरवळ यांच्याकडे या प्रकरणावर निर्णय देण्याची जबाबदारी येऊ शकते असं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचं असं नॉटरिचेबल होणं अत्यंत खळबळजनक मानलं जात आहे.

Tags

follow us