Chagan Bhujbal On Babanrao Gholap : शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप शिवसेना ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावरुन आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांना टोला लगावला आहे. छगन भुजबळ म्हणाले की, बबनराव घोलप हे सध्या आपण खूप निष्ठवान असल्याचे दाखवत आहेत. असं असलं तरी 1991 मध्ये शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये जाण्याची यादी तयार केली होती. त्यात बबनराव घोलप यांचं नाव आणि सही खूप वर होती, अशा शब्दात टीका केली आहे.
अंडरवियरच्या विक्रीत घट; डेटिंग अॅप अन् वेबसाईट्सला पसंती : भारत मंदीच्या उंबरठ्यावर?
मंत्री भुजबळ (Chagan Bhujbal)यांनी नुकत्याच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. एक-दीड वर्षांपूर्वी छगन भुजबळ शिवसेनेमध्ये येणार होते. त्यावेळी त्यांचा प्रवेश आपण स्वतः रोखल्याचे बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी म्हटले होते, त्यांच्या या वक्तव्याला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नार्वेकर अन् शिंदे गट बॅकफूटवर; ठाकरे गटाला दिलासा : सर्वोच्च न्यायालयात काय काय घडलं?
मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal)म्हणाले की, आपण आजपर्यंत कोणालाही कधीही शिवसेनेत जायचे असल्याचे कुणाकडेही म्हटलेलं नाही. कधी कुणाला भेटायला देखील गेलो नाही. आपले कार्यकर्ते चर्चा करत असतील तर त्याबद्दल माहिती नाही. बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी काहीही कारण नसताना हा विषय काढला आहे. ते ठाकरे गटाला सोडण्याचा विचार करत आहेत. घोलप यांना ज्या पक्षात जायचं आहे, त्या पक्षात त्यांनी जावं, असंही यावेळी छगन भुजबळ म्हणाले.
भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले की, घोलप हे स्वतःला अतिशय निष्ठावान असल्याचे दाखवून देत आहेत. मात्र ज्यावेळी शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये जाण्यासाठी इच्छुक आमदारांची यादी तयार केली होती. त्यामध्ये घोलप यांची सही वरच्या नावांमध्ये होती, असा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं. ओबीसी आरक्षण वाढविणे आणि त्यात मराठा समाजाचा समावेश करणे, यातील गोंधळ संपवण्यासाठी एक उपाय सुचवला आहे. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आरक्षणात 10 टक्के वाढ करण्यासाठी आधीच केंद्र सरकारशी संवाद साधला आहे.