Download App

तांबेंवरून संजय राऊतांचा मविआला घरचा आहेर

मुंबई : ‘राज्यात जेव्हा महाविकास आघाडीच सरकार होत. ते तिन्ही पक्षांनी एका कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर समन्वय राखून सरकार चालवलं. पण आता विरोधी पक्षात असतानाही समन्वय असावा ही अपेक्षा. विधानपरिषद निवडणुकीत गोंधळ झालाच हे मान्य, तो नाकारू शकत नाही. काँग्रेसबाबत गोंधळ झाला. तरी तो मविआचाच भागम्हणून बघायला हवा. कारण या पाच जागांबाबत एकत्र बसून चर्चा व्हायला हवी होती. मी कोणाला दोष देत नाही.’अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवरुन मोठा ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या दिवशी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर भाजपने सत्यजित तांबे यांना अप्रत्यक्षपणे जाहीर पाठिंबा दिलाय. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्याबरोबर संजय राऊत म्हणाले की, ‘अमरावतीला आमच्याकडे उमेदवार होता. नाशिकमध्ये जो घोळ झाला आहे. त्याबद्दल कोणालाच जबाबदार धरण्यात येणार नाही. अशा उलट्या पालट्या सगळ्याच पक्षात होत असतात. काँग्रेस एकनिष्ठ तांबे यांना भाजपनं गुप्तपणे नेमकं काय केलं ? हे प्रत्येकवेळी आपल्याला समजतंच असं नाही. त्यांनी जी चूक केली त्याला तेच जबाबदार आहेत.’

‘मविआमध्ये निर्णय घेताना समन्वय राखणं आवश्यक हे शिवसेनेचं स्पष्ट मत असल्याचं संजय राऊत म्हणाले. तर जम्मूमध्ये भारत जोडो यात्रेत सामील होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळत आहे. तर नाशिक पदवीधर बिनविरोध होणार नाही. त्यासंदर्भातथोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक होणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

दरम्यान, भाजपने राज्यातील पाचही मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेआधीच जाहीर केले होते. मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून सस्पेंस ठेवण्यात आला होता. मागील 20 वर्षांपासून कॉंग्रेसचे एकनिष्ठ समजले जाणारे तांबे पिता-पुत्रांकडून उमेदवारीबाबत असा गेम खेळण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय.

Tags

follow us