Download App

नाशिकवाल्यांनो अस्वस्थ होऊ नका, प्रितमबद्दल ‘ते’ वक्तव्य गमतीनं केलं; पंकजा मुंडेचं स्पष्टीकरण

नाशिक लोकसभा प्रितम मुंडे लढवतील हे वक्तव्य गमतीने केलं होत. तसंच भुजबळांचा सल्ला वडिलकीच्या नात्याने स्वीकारते अस पंकजा मुंडे म्हणाल्या.

  • Written By: Last Updated:

Pankaja Munde : लोकसभेच्या रणसंग्रामता कोण काय बोलतो याकडं सर्वांचं लक्ष असतं. तो कोणत्या अर्थाने बोलला हा विषय नंतरचा. त्यामध्ये थेट विषयावर चर्चा होण्यास लगेच सुरूवात होते. बीड लोकसभेच्या ( Pritam Munde) उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नुकतंच नाशिक लोकसभेबाबत प्रितम मुंडे यांना अनुसरून एक वक्तव्य केलं. त्यावरून गेली दोन-तीन दिवसांपासून चांगलच राजकारण तापलं आहे.

 

आधी बीडच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा, भुजबळांनी पंकजा मुंडेंना सुनावलं

बीड जिल्ह्यात जोरदार प्रचार

प्रितम मुंडे या बीड लोकसभेच्या 10 वर्ष खासदार होत्या. यावेळी मात्र, भाजपने त्यांचं तिकीट कट करून पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. सध्या पंकजा मुंडे यांच्यासह धनंजय मुंडे आणि इतर नेत्यांचा बीड जिल्ह्यात जोरदार प्रचार सुरू आहे. असाच प्रचार सुरू असताना पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर चांगलच वातावरण तापलं आहे.

 

आणखी कोणत्याचं बाजून एकमत नाही

नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्येच आणखी एकमत झालेलं नाही. शिवसेनेकडून हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा आहे असा दावा आहे. तर, राष्ट्रवादीची इथं मोठी ताकद असून तो आम्हाला मिळावा असा राष्ट्रवादीचा जोरदार दावा आहे. त्यावर आणखी कोणत्याचं बाजून एकमत झालेलं नाही. त्यातच पंकजा यांनी असं वक्तव्य केल्याने हा विषय नव्याने चर्चे आला.

 

छगन भुजबळांनी नाशिकचं मैदान सोडलं, लोकसभा निडणुकीतून माघार; वाचा नक्की काय घडलं?

वक्तव्य गमतीने कंल होतं

या वक्तव्यावरून पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सल्ला दिला आहे. आपण बीडकडे लक्ष द्या असा सल्ला भुजबळ यांनी दिला. त्यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या भुजबळ यांचा सल्ला मी वडिलकीच्या नात्याने स्वीकारते. तसंच, हे वक्तव्य गमतीने केलं होतं. लोकांनी ते समजून घेतलं नाही असंही पंकजा मुंडे यावर बोलताना म्हणाल्या आहेत.

 

follow us