Download App

मी पक्षात कोणते पद मागितले?; येवल्याच्या सभेतून सुप्रिया सुळेंनी घेतला समाचार

Supriya Sule : नाशिकमधून(Nashik) येवल्यामध्ये आज येत असताना प्रत्येकजण गाडी थांबवून सांगत होता की ताई तू लढ, घाबरु नको. त्यातील प्रत्येकजण सांगत होता की, तुम्ही घाबरु नका लढा, त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अरे मी घाबरत नाही, घाबरत असते तर त्यांच्याबरोबर गेले नसते का? जो डर गया वो मर गया असे म्हणत नाव न घेता अजितदादांवर(Ajit pawar) जोरदार निशाणा साधला आहे. आज शरद पवार यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्यांची पहिलीच सभा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या बालेकिल्ल्यात येवल्यात सुरु आहे. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी आपण राष्ट्रवादीमध्ये एवढ्या वर्षांपासून निष्ठेने काम केले पण कोणते पद मागितले नाही. फक्त पक्षासाठी काम करत राहिले, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.(nashik supriya sule Criticise on Ajit pawar chagan bhujbal ncp yeola)

शरद पवारांनी मुंडेंचं घर फोडलं नाही; हे रंग बदलणारे सरडे; भुजबळांच्या टीकेवर आव्हाडांचा घणाघात

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंड करुन अजितदादांसह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या सर्वांनी ईडी सीबीआयच्या धाकामुळे हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मी घाबरले असते तर त्यांच्याबरोबर गेले नसते का? असं म्हटल्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.

Rahul Gandhi : ट्रकचालक ते शेतकरी! राहुल गांधींचे खास किस्से अन् साधलं राजकारणही..

आज येवल्यात आल्यानंतर महिला भगिनी दिसत आहेत. आज ते भाजपाबरोबर गेले आहेत. मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही. आज महागाईची काय परिस्थिती आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस ज्यावेळी सत्तेत होता त्यावेळी घरगुती गॅस सिलेंडरचा भाव काय होता? साडेतीनशे रुपये भाव होता. आता गॅस सिलेंडरचा काय भाव आहे? महागाई वाढली की कमी झाली? असा सवाल यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना केला.

Bharat Jadhav: “हे शहर आता…,” भरत जाधवने थेटच सांगितले मुंबई सोडण्यामागचं खरं कारण…

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, येवल्यामध्ये आल्यानंतर कांद्याचे मोठे कॅरेट पाहिले. अन् यावर्षी केंद्र सरकार आणि माझं भांडण कांद्याच्या भावावरुन झालं आहे. आज कांद्याला भाव काय आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. जगामध्ये कांदा कमी आहे आणि भारतात कांदा जास्त पिकला आहे. मी अनेकवेळा संसदेमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पन्नासवेळा कांद्याला भाव देण्याची मागणी केली आहे. परदेशात कांदा जाऊ द्या अशी मागणी अनेकवेळा केली पण त्यांनी ऐकले नाही, आज शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं असेल, त्यांचं नुकसान झालं असेल तर हे सगळं पाप भाजपाने केल्याचेही यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी महागाईवरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याचवेळी स्थानिक आमदार छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, स्थानिक नेते तुमच्यासाठी लढले की नाही मला माहित नाही पण ही हक्काची ताई तुमच्या हक्कासाठी लढेल आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असा शब्द यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

Tags

follow us