Rahul Gandhi : ट्रकचालक ते शेतकरी! राहुल गांधींचे खास किस्से अन् साधलं राजकारणही..

Rahul Gandhi :  ट्रकचालक ते शेतकरी! राहुल गांधींचे खास किस्से अन् साधलं राजकारणही..

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) शनिवारी सकाळीच हरियाणात ट्रॅक्टर चालविताना दिसून आले. त्यांनी शेताीच्या कामात मदत करत भाताची लावणीही केली. याआधीही त्यांचे असे काही फोटो व्हायरल झाले होते. ज्यामध्ये कधी ते ट्रकचालकांबरोबर गप्पा मारताना दिसत आहेत तर कधी मोटर मॅकेनिकबरोबर संवाद साधताना दिसतात. कधी तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर दिसतात तर कधी कॉलेजच्या कँटीनमध्ये जेवण करताना दिसतात.

चला तर मग जाणून घेऊ या राहुल गांधी केव्हा केव्हा अशा पद्धतीने जनसामान्यांत रमताना दिसले. त्यामागील राजकारण काय आहे हेही माहिती करून घेऊ या..

राहुल गांधी आज सकाळी अचानक हरियाणातील बरोदा या ठिकाणी पोहोचले. येथील एका गावात त्यांनी शेतकरी आणि मजुरांशी गप्पा मारल्या. शेतीपिकांची माहिती घेतली इतकेच नाही तर ट्रॅक्टर चालवला आणि त्यांच्याबरोबर भात लावणीही केली.

‘आमच्या पक्षात आम्ही सगळेच मंत्री’; नाराजीच्या चर्चांवर शिंदे गटाच्या मंत्र्याचं मिश्कील उत्तर

याआधी राहुल गांधी कुठे दिसले होते

मागील महिन्यात 27 जून रोजी राहुल दिल्लीतील करोल बाग येथील दुचाकी वाहने दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीच्या दुकानात पोहोचले होते. त्यांनी येथील मॅकेनिकबरोबर गप्पा मारल्या आणि नंतर याचे फोटो फेसबुकवर अपलोड केले होते.

अमेरिकेतील ट्रक यात्रा

23 जून रोजी राहुल गांधी अमेरिकेत एका भारतीय ट्रक चालकाबरोबर वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क असा प्रवास केला. या प्रवासात त्यांनी ट्रकचालकाबरोबर बराच वेळ संवाद साधला. येथील ट्रकचालकांची काय परिस्थती आहे, त्यांना किती पैसे मिळतात याची माहिती त्यांनी घेतली.

चंदीगडमधील ट्रकचा प्रवास

23 मे रोजी राहुल यांनी दिल्ली ते चंदीगड असा प्रवास ट्रकने केला होता. या दरम्यान त्यांनी ट्रकचालकांच्या समस्या समजून घेतल्या. रस्त्यातील ढाब्यांवर थांबून त्यांनी येथील ट्रकचालकांशीही संवाद साधला.

आमचे सहकारी आता परत फिरणाऱ्या चिमण्या नाहीत; तणावातही पवारांची शाब्दिक कोटी

झोपडपट्टीतील महिलांना भेटले

17 मे रोजी राहुल गांधी दिल्लीतील शूकर रहिवासी परिसरात पोहोचले. येथे रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांबरोबर संवाद साधला. महिलांनीही त्यांना आपल्या समस्या ऐकवल्या.

5 मे रोजी राहुल गांधी यांनी दिल्ली विश्वविद्यालयातील वसतिगृहांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. येथे ते बराच वेळ होते. येथील कँटीनमध्ये त्यांनी जेवणही घेतले. या दरम्यान शिक्षस, रोजगार, बेरोजगारी या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांचे काय म्हणणे आहे हे ऐकले.

या संवादाचा अर्थ काय?

राहुल गांधी सध्या ज्या सर्वसामान्य लोकांना भेटत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. हे खरे तर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा आहे. यासाठीही पक्षाने एक मोठा प्लॅन तयार केला आहे. या योजनेंतर्गत कारागीर, सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, हॉटेलवर काम करणारे कामगार यांसारख्या रोज कमावणाऱ्या लोकांना राहुल गांधी भेटणार आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते पी. एल. पुनिया म्हणाले, की राहुल गांधी ज्या पद्धतीने देशातील सामान्य लोकांना भेटत आहेत त्यामुळे या लोकांचा विश्वास वाढत आहे. दुसरीकडे लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत याची आम्हालाही माहिती मिळत आहे. राजकीय विश्लेषक जटाशंकर सिंह म्हणतात, राहुल गांधींच्या भेटीगाठी आगामी निवडणुकांत काँग्रेससाठी बूस्टर डोस ठरण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube