Nawab Malik : भाजपच्या (BJO) विरोधानंतरही अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक (Nawab Malik) यांना उमेदवारी दिली. अजितदादांच्या या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. मलिक यांच्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचं भाजप नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच मलिक यांचा दाऊदशी संबंधित असल्याचा आरोपही काही भाजप नेत्यांनी केला होता. त्यावर आता मलिकांनी भाष्य केलं.
जे बुद्धीला पटले तेच मी आर. आर. पाटलांबद्दल बोललो अन् आता …, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
माझा दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना मी कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
नवाब मलिक म्हणाले की, माझ्या प्रचाराला या, असा आग्रह मी करत नाही. मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार आहे, जनतेच्या पाठबळाच्या आधारावर मी निवडणूक लढवत आहे. मात्र जे माझे नाव दाऊदशी जोडत आहेत. त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे. गुन्हेगार, दहशतवादाचा कोणताही खटला माझ्यावर नाही. जे लोक माझ्यावर असे आरोप करत आहेत, त्यांच्याविरोधात मी उच्च न्यायालयात जाणार आहे. मी मानहानीचा खटला दाखल करणार आहे. ते करत असलेले सर्व आरोप निराधार आहेत, असंही मलिक म्हणाले.
पुढं ते म्हणाले, मी माझी विचारसरणी बदलणार नाही. माझी माझ्या विचारांशी बांधिलकी आहे, असंही मलिक म्हणाले.
“देवेंद्र तात्यांनी मला खूप शिकवलं”, विजयाचा फॉर्म्युला सांगत जरांगेंचा फडणवीसांना टोला
अजितदादांशिवाय सरकार बनू शकत नाही…
मलिक म्हणाले की, आमची विचारधारा स्पष्ट आहे, आमचा धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास आहे. राहिला मुद्दा निवडणुकीचा तर ही लढत अटीतटीची होणार. आणि महाराष्ट्रातील कोणतेही सरकार अजित पवार यांच्याशिवाय बनू शकत नाही, तसंच अजित पवार आपल्या विचारांशी तडजोड करु शकत नाही, असंही मलिक म्हणाले.
दरम्यान, मागील वेळी अणुशक्तीनगरमधून विजयी झालेले मलिक यंदा मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शिंदे गटाने या जागेवर सुरेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून समाजवादी पक्षाचे अबू आझमी रिंगणात आहेत.