अजित पवारांचे तीन आमदार विजयी, राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी हालचाली सुरू

अरुणाचलमध्ये अजित पवारांचे तीन आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार आहे.

Ajit Pawar 10

Ajit Pawar 10

Ajit Pawar NCP: अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत (Arunachal Pradesh Assembly Elections) अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) तीन आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार गट लवकरच निवडणूक आयोगाकडे (Election Commission) दावा हा दावा दाखल करणार आहे.

Beed Loksabha : बजरंग सोनवणेंची निवडणूक अधिकाऱ्यांना धमकी, ‘अन्यथा स्वत:ला संपवून घेऊ… 

गेल्या वर्षी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला होता. मात्र आता अरुणाचल प्रदेशातील विजयानंतर राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याासाठी दावा करणार आहे. लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गट हा दावा करणार आहे.

अजित पवारांचे तीन राज्यात आमदार
अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाचे तीन उमेदवार टोको तातुंग, लिखा सोनी आणि निख कमिन विजयी झाले आहेत. या विजयामुळे अजित पवार यांच्या गटाकडे आता महाराष्ट्र, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या देशातील तीन राज्यांमध्ये आमदार आहेत. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला दहा टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत.

Baichung Bhutia ने देशासाठी गोल डागले ! पण राजकारणात सहाव्यांदा मतदारांकडून ‘रेड कार्डच’ 

केंद्रीय निवडणूक आयोग हा निवडणूक चिन्ह कायदा, 1968 अंतर्गत पक्षाला राष्ट्रीय दर्जा प्रदान करतो. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीनंतर वेळोवेळी मतांची टक्केवारी आणि इतर बाबी तपासून पक्षाला राष्ट्रीय दर्जा द्यायचा की काढून घ्यायचा? हे करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. गेल्या वर्षी नागालँड विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला होता. राष्ट्रवादीला 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रीय दर्जा मिळाला होता.

पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी निकष काय?

पहिली अट अशी आहे की, पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी संबंधित पक्षाने लोकसभा निवडणुकीत तीन वेगवेगळ्या राज्यात 2 टक्के जागा जिंकल्या पाहिजेत. दुसरी अट म्हणजे लोकसभेत किमान 4 खासदार असावेत. यासोबतच चार राज्यांच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मते मिळायला हवीत. तिसरी अट म्हणजे संबंधित पक्षाला किमान 4 राज्यांमध्ये राज्य पक्षाचा दर्जा मिळायला हवा.

Exit mobile version