अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपची हॅट्रीक, एकहाती सत्ता खेचणारे पेमा खांडू आहेत तरी कोण?

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपची हॅट्रीक, एकहाती सत्ता खेचणारे पेमा खांडू आहेत तरी कोण?

Pema Khandu Will Became CM : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election) निकालापूर्वी भारतीय जनता पक्षात जल्लोष सुरू झाला. 19 एप्रिल रोजी झालेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या (Arunachal Pradesh Legislative Assembly) निवडणुकीत भाजपने (BJP) 46 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झालीये. त्यामुळं पेमा खांडू (Pema Khandu) तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. दरम्यान, दरम्यान, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे पेमा खांडू आहेत तरी कोण? त्यांची राजकीय कारकीर्द कधी सुरू झाली? याच विषयी जाणून घेऊ.

अपघात प्रकरण ताजं असताना पुणे पोलिसांचा आणखी एक प्रताप; नाकेबंदीवेळी चालकाकडून चेपून घेतले पाय 

पेमा खांडू मोनपा जमातीचे
पेमा खांडू यांचा जन्म 21 ऑगस्ट 1979 रोजी तवांग येथे झाला. चीनच्या सीमेला लागून असलेल्या तवांग जिल्ह्यातील ग्यांगखार गावातील पेमा खांडू हे मोनपा जमातीचे आहेत. तवांगमधील बोंबा येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर 2000 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

अरुणाचल प्रदेशात अजितदादांचा डंका; विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीन उमेदवार विजयी 

पेमा खांडूचा 2005 मध्ये राजकारणात प्रवेश
पेमा खांडू यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील दोरजी खांडू हे अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. पेमा खांडू यांनी 2005 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्याकडे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण, त्याचा खरा राजकीय प्रवास सुरू होतो तो, त्यांचे वडील दोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर.

2011 मध्ये लढवली विधानसभा
दोरजी खांडू हे 2007 ते 2011 पर्यंत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. यानंतर पेमा खांडू यांनी 2011 मध्ये आपल्या वडिलांच्या विधानसभा मतदारसंघ मुक्तो येथून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. यानंतर पेमा खांडू यांचा अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. 2014 मध्ये, माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पेमा खांडू यांची नगरविकास मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

2016 ला पहिल्यांदा सीएम
2014 मध्ये पेमा खांडू यांनी असंतुष्ट नेते कालिखो पुल यांना पाठिंबा देत मंत्रीपद सोडले. त्यामुळे तुकी सरकारला सत्तेतून बाहेर पडावं लागलं. 16 जुलै 2016 रोजी नबाम तुकी यांच्या जागी पेमा खांडू यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. यानंतर, 17 जुलै 2016 रोजी खांडू यांनी वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले.

अवघ्या दोन महिन्यांनंतर खांडू यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या 43 आमदारांनी बंडखोरी केली. खांडू यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदार भाजपच्या सहयोगी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) मध्ये सामील झाले. मात्र, नंतर पीपीएने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आणि खांडू यांच्यासह अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अरुणाचल प्रदेश जिंकला आणि पेमा खांडू मुख्यमंत्री झाले.

पेमा खांडू सर्वात तरुण मुख्यमंत्री

पेमा खांडू हे भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत, त्यांनी वयाच्या 37 व्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. खांडू यांच्यापूर्वी अखिलेश यादव हे भारताचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. अखिलेश यांनी वयाच्या 38 व्या वर्षी पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती.

फुटबॉल, क्रिकेट या खेळांची आवड

पेमा खांडू यांना खेळाची आवड आहे. त्यांना फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल या खेळांमध्ये प्रचंड रस आहे. राजकारणात आल्यानंतर त्यांनी खेळाच्या प्रसारासाठी खूप प्रयत्न केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज