अपघात प्रकरण ताजं असताना पुणे पोलिसांचा आणखी एक प्रताप; नाकेबंदीवेळी चालकाकडून चेपून घेतले पाय

अपघात प्रकरण ताजं असताना पुणे पोलिसांचा आणखी एक प्रताप; नाकेबंदीवेळी चालकाकडून चेपून घेतले पाय

Pune Police pinched Feet by youngster after Pune Accident : एकीकडे कल्याणीनगर अपघात ( Pune Accident ) प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यात पुणे पोलिसांची ( Pune Police ) भूमिका पहिल्या दिवशी पासूनच वादग्रस्त ठरली आहे. त्यात आता कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिसांचा आणखी एक अजब प्रताप समोर आला आहे. यावेळी पोलिसांनी नाकेबंदी करत असताना एका वाहन चालकाकडून चक्का पाय चेपून घेतले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तसेच पुणे पोलिसांच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याणीनगर अपघाताची घटना देशभर गाजत असताना त्याच पुण्यातील कल्याणीनगर भागातून पुणे पोलिसांबाबतचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री या भागामध्ये नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करत असताना पोलीस अधिकाऱ्याने एका युवकाकडून चक्क पाय चेपून घेतले आहेत. सणसवाडी परिसरामध्ये काही युवक कारने घराकडे जात होते. यावेळी या तरुणांकडून पोलिसांनी दंड वसूल केला. एवढ्यावरच पोलीस थांबले नाही. तर एका पोलीस अधिकाऱ्याने कारमधील युवकाला पाय दाबून देण्यास सांगितले. पोलिसांच्या भीतीने या तरुणाने पोलिसांचा आदेश पाळला. मात्र एक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अरुणाचल प्रदेशात अजितदादांचा डंका; विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीन उमेदवार विजयी

त्यामुळए एकीकडे कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन तरूणाला पोलिसांनी दिलेली वागणूक, गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब त्याचबरोबर दोन लोकांचा जीव घेणाऱ्या या तरूणाला काही तासांत मिळालेला जामीन या सर्व गोष्टींमुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर राज्यभरातून टीका केली जात आहे. त्यात आता या वाहन चालकाकडून पाय दाबून घेण्याच्या प्रकारे आणखी कहर केला आहे. त्यामुळे यावर आता पोलिस आयुक्त यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

उमेदवार बदलण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा डाव फसला; हिंगोलीकरांची ठाकरे गटाला आघाडी

दरम्यान पुणे अपघात प्रकरणी (Pune Car Accident) अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल (Shivani Agrwal) आणि वडिल विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांना 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीयं. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणावर आज पुणे जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज