Download App

‘त्यावेळी ते प्राथमिक शाळेत असतील’; पवारांनी उडवली फडणवीसांच्या वक्तव्याची खिल्ली

Sharad Pawar On Devendra Fadanvis :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या 1977  साली स्थापन केलेल्या पुलोद सरकारवरुन प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर पवारांनी सडेतोड उत्तर दिले. त्यावेळी फडणवीस प्राथमिक शाळेत असतील, ते अज्ञानापोटी अशी वक्तव्य करत असतात, असा टोला पवारांनी फडणवीसांना लगावला. यावेळी ते बारामती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, मी कधी मुत्सद्देगिरी केली?  त्यांनी सांगाव. 1977 साली आम्ही सरकार बनवलं पण त्यावेळचा भाजपही आमच्या सोबत होता. फडणवीस तेव्हा लहान असतील त्यामुळे त्यांना माहिती नसेल,पण त्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो.मी जे सरकार बनवलं होतं ते सर्वांना सोबत घेऊन बनवलं. त्यात त्यावेळचा जनसंघ, त्यातले उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर हशू आडवानी हेदेखील होते. आणखीही काही सदस्य होते, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. पण मला वाटतं फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना त्याकाळातली फारशी माहिती नसेल. त्यांच्या अज्ञानापोटी ते अशी स्टेटमेंट करत असतात, असे म्हणत पवारांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला.

पवारांनी केलं तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केलं तर गद्दारी कशी काय? फडणवीसांचा राष्ट्रवादीला सवाल

वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 व अपक्ष 10 आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर त्यांच्यावर गद्दार, खोके-बोके अशी टीका करण्यात येते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसदेखील आघाडीवर आहे. यावरुनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला 1977 सालच्या सरकारची आठवण करुन दिली होती.

600 गाड्यांच्या ताफ्यासह बीआरएसचं वादळ सोलापूरच्या दिशेने; महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठे धक्के बसणार?

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस 

1977 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. हे सरकार दोन वर्ष चाललं असतं. इंदिराजींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं, तर पाच वर्ष चाललं. त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

Tags

follow us