Download App

Sharad Pawar : ‘कायदा हातात घेणाऱ्यांना मोकळीक’; ‘गोळीबारा’च्या घटनेवर शरद पवारांचे सरकारला खडेबोल

Image Credit: Letsupp

Sharad Pawar : उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजप नेत्याने शिंदे गटाच्या (Ganpat Gaikwad Firing) नेत्यावर गोळीबार केला. आता या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा थरारक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

प्रसारामाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, सध्या ज्यांच्या हातात राज्याची सूत्रं आहेत. तिथं कायदा हातात घेणाऱ्यांबद्दल मुक्तता किंवा मोकळीक आहे असं ऐकायला मिळतं ते वास्तव आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. त्यालाही काही मर्यादा आहेत. परंतु, गोळीबाराच्या घटनेत जर सरकार बघ्याची भूमिका घेत असेल तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे हे त्याचं एक उदाहरण म्हणावं लागेल. अशा गोष्टी राज्यातील जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत.

Sharad Pawar : मी 72 हजार कोटींचे कर्ज माफ केले, पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघितले जात नाही 

नेमकं काय घडलं ? 

उल्हासनगरच्या द्वारली गावातील जागेवरून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात वाद सुरू होता. हिल लाईन पोलिसांनी काल दोघांनाही बोलावलं होतं. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सु्मारास दोघांतील वाद विकोपाला गेला. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात महेश गायकवाड यांचे मित्र राहुल पाटील सुद्धा जखमी झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्येच गोळीबाराची घटना घडली. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढण्यात आल्या.

कडक कारवाई करणार : फडणवीस 

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबारामागे काय सत्य आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल. त्यामुळे या प्रकरणाचे वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत. या प्रकरणी अत्यंत कडक कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

कल्याण : CM शिंदेंच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; भाजप आमदार गणपत गायकवाडांचे पोलिसांसमोरच कृत्य

follow us

वेब स्टोरीज