Download App

NCP Crisis : शरद पवार गटानं हेरलं अजितदादांचं ‘ते’ वाक्य; आता टाकणार पॉवरफुल्ल डाव?

NCP Crisis : अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील लढाई (NCP Crisis) आता निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचली आहे. अजित पवार गटाने आधीच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर आधीच दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटानेही मोठा डाव टाकत अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्लॅन आखला आहे. अजित पवार यांनी केलेलं वक्तव्यच या गटानं हेरलं असून या विरोधात निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

खरं तर अजित पवार यांनी ठाकरे आणि शिंद गटातील वादावर एक विधान केलं होतं. ‘निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत. मला सांगा, ते म्हणतात की बाबा 40 आमदार आणि काही खासदार एका बाजूला गेले म्हणून तिकडे आम्ही पक्ष आणि चिन्ह दिलं. मग एखाद्या पक्षाचे एक किंवा दोन आमदार असतील ते एका बाजूने गेले.. आता मनसेचं उदाहरण घ्या. मनसेचा एक आमदार आहे. तो म्हणाला इंजिनही माझं, पक्षही माझा तर मग तुम्ही तसाच निर्णय देणार का?’ असे अजित पवार म्हणाले होते.

अजितदादांसोबत वाद; जयंत पाटील भुजबळांच्या बाजूने; ‘ओबीसी’ मुद्दा ठरणार मनोमिनलाचा पॅटर्न?

अजित पवार यांच्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता यावर आगामी काळात काय घडामोडी घडतात. खरंच शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली जाणार का? जर तक्रार दाखल केली गेली तर त्याला अजित पवार गटाकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

6 ऑक्टोबरपासून सुनावणी

दरम्यान, अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांनी पक्ष आणि गट यांवर दावा ठोकला आहे. हा वाद सध्या निवडणूक आयोगाकडे आहे. यावर आता 6 ऑक्टोबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. या सुनावणीत काय होणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. सध्या या घडामोडींची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Vijay Wadettiwar : ‘दोन लोकं जरी भाजपबरोबर गेली तरी पक्ष त्यांचाच’; वडेट्टीवारांनी सांगितलं कारण

पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल – भुजबळ

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळेल असा दावा केला आहे. आमच्याकडे बहुमत आहे. संख्याबळ आहे. त्यामुळे निवणूक आयोग आम्हाला न्याय देईल असा दावा मंत्री भुजबळ यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणे  महत्वाचे ठरणार आहे.

follow us