Vijay Wadettiwar : ‘दोन लोकं जरी भाजपबरोबर गेली तरी पक्ष त्यांचाच’; वडेट्टीवारांनी सांगितलं कारण

Vijay Wadettiwar : ‘दोन लोकं जरी भाजपबरोबर गेली तरी पक्ष त्यांचाच’; वडेट्टीवारांनी सांगितलं कारण

Vijay Wadettiwar : एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना बरोबर (Vijay Wadettiwar) घेत बंड घडवून आणलं. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हही मिळवलं. आता शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. त्यानंतर जुलै महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राष्ट्रवादीत बंड करत वेगळी वाट धरली. अजित पवार गट राज्यात सत्तेत आहे. त्यानंतर आता या गटाने राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह आणि पक्षावरच दावा ठोकला आहे. या घडामोडींवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे.

हो, अजितदादांसमोर मी माझा मुद्दा मोठ्या आवाजात मांडला : भुजबळ

काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वडेट्टीवार म्हणाले, निवडणूक आयोग भाजपाच्या खिशात असल्यामुळे कोणालाही पक्ष आणि पक्षचिन्ह मिळू शकतं. जो गट भाजपबरोबर जाईल त्यांना चिन्ह मिळेल. 25 आमदार गेले, 30 आमदार गेले उद्या 2 किंवा 3 जण गेले तरी ते पक्षाचं चिन्ह घेऊन जातील. आपला देश हुकुमशाही असल्याप्रमाणे चालला आहे. सगळाच मनमानी कारभार सुरू आहे. देशात काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. जो व्यक्ती भाजपबरोबर जाईल त्याला पक्ष मिळेल. उद्या दोन माणसं जरी भाजपबरोबर गेली आणि त्यांनी पक्ष व पक्षचिन्हावर दावा केला तरी त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळू शकतं.

तरुणांनो, ‘त्या’ जीआरची होळी करा, सत्ताधाऱ्यांना फिरकू देऊ नका

आरक्षण संपवण्याचा घाट सरकारकडून घातला जात आहे. ओबीसी तरुणांना आवाहन आहे या जीआरची होळी करा. हा जीआर ओबीसी, एससी, एसटी तरुणांवर अन्याय करणारा आहे. जीआर रद्द होत नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांना गावात फिरकू देऊ नका. सरकारी पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. विशिष्ट विचारधारेची व्यक्ती कंत्राटी पद्धतीने सरकारच्या इशाऱ्यावर काम करील. मेरिट डावलून फक्त मर्जीतील माणसांची भरती केली जाईल. आरक्षण संपवले जाईल. हा संपूर्ण खेळ आमच्या ओबीसी नेत्यांना कळत नाही का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

पैसे घेऊन 28 लाख लोकांना OBC प्रमाणपत्र; वडेट्टीवारांच्या आरोपाने खळबळ !

पैसे घेऊन 28 लाख लोकांना ओबीसी सर्टिफिकेट

मराठवाड्यात गुपचूपपणे मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 28 लाख लोकांना पैसे देऊन ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. इतकेच नाही तर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मराठा असूनन ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचे निदर्शनास आणून दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube