Download App

वादग्रस्त विषय टाळाच! एकनाथ खडसेंनी भर शिबिरातच आव्हाडांचे कान टोचले

Eknath Khadse On Jitendra Awhad : श्रद्धा, भावना आणि निवडणुकीदरम्यान वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळाच, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे शिबिरातच कान टोचले आहेत. दरम्यान, काल जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल विधान केलं होतं. या विधानानंतर राज्यभरात वादंग पेटलं. आव्हाडांच्या विधानानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यावर खडसेंनी भर शिबिरातच आव्हाडांचे कान टोचले आहेत.

‘आधी अनधिकृत आता अधिकृतपणे फोन टॅप होणार’; शुक्लांची नियुक्ती होताच खडसेंचा आरोप

एकनाथ खडसे म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी काल रामाबद्दल विधान केलं आहे. कदाचित ते त्यांचं व्यक्तिगत मत असेल ते पक्षाचं मत नाही. एक लक्षात ठेवा ज्या ठिकाणी श्रद्धा, भावनेचा विषय असतो, अशावेळी वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळावं. जितेंद्र आव्हाडांना वडिलकीच्या नात्याने मी सांगणार आहे माझा तो अधिकार असल्याचं एकनाथ खडसेंनी यावेळी म्हणाले आहेत.

‘भपकेबाजीला घाबरु नका, सत्तेत फुकवटा असतो’; जयंत पाटलांची टोलेबाजी

तसेच मदमाशांच्या पोळ्याला का दगड मारायचा? कशाला अंगावर घ्यायचं? अनेक विषय आहेत बोलायला. जितेंद्र आव्हाडांच मत असू शकतं ते खरंही असेल
पण ते माझं मत नाही. माझी श्रद्धा तुमची लाखो लोकांची श्रद्धा आहे. काल पत्रकार मला विचारत होते की, आव्हाडांच्या विधानावर तुमचं मत काय? आता
प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रियाच देत बसायची का? निवडणुकीदरम्यान, असा कोणताही वादग्रस्त विषय घेऊ नका जरी खरं असलं तरीही… असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात निर्यातबंदीमुळे कांदा, कापूस, सोयाबीनला, भाव नाही. मागील वर्षा कांदा 16 हजार प्रतिक्विटंलला गेला होता. आता केंद्राने शुल्क आकारल्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही, असंही ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते आव्हाड?
शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या सर्वच दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातून अनेक नेत्यांनी मार्गदर्शनपर भाषण केल्याचं पाहायला मिळालं. याचदरम्यान, जितेंद्र आव्हाड भाषण करीत होते. भाषणादरम्यान, भाजप आणि शिंदे गटावर त्यांचा चांगलाच तोल जात होता.

येत्या काही दिवसांत अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, राम आपला, बहुजनांचा. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात, पण आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. 14 वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

follow us