‘आधी अनधिकृत आता अधिकृतपणे फोन टॅप होणार’; शुक्लांची नियुक्ती होताच खडसेंचा आरोप

‘आधी अनधिकृत आता अधिकृतपणे फोन टॅप होणार’; शुक्लांची नियुक्ती होताच खडसेंचा आरोप

Eknath Khadse On Rashmi Shukla : आधी अनधिकृत पण आता अधिकृतपणे फोन टॅप होणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची वर्णी लागलीयं. याआधी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांनंतर आता पुन्हा एकनाथ खडसे यांनी शुक्ला यांच्याबाबत भविष्यवाणी केली आहे.

Kolhapur : राजकीय हालचालींना वेग; भाजपची ताकद वाढणार? सतेज पाटलांबद्दल मोठा गौप्यस्फोट

एकनाथ खडसे म्हणाले, राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच सरकार आल्यानंतर रश्मी शुकला यांना बढती होईल हे माहिती होतं. शुक्ला यांनी मला न विचारता माझा फोन टॅप केला होता.. आपल्या सरकारमध्ये आपले ऐकणारे अधिकारी हवे असल्यानेच सरकारकडून रश्मी शुक्ला यांना पोस्टिंग मिळाली आहे. याआधी अनधिकृत पण आता अधिकृतपणे फोन टॅप होतील, त्यामुळे विरोधकांनी अधिक सावध राहण्याची गरज असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होणार ‘अ‍ॅनिमल’; कुठे अन् कधी पाहाल?

तसेच यासंदर्भात मी सभागृहात मुद्दा मांडला होता, त्यावर अद्याप उत्तर मिळालेल नाही. रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांना राखी बांधली. त्यामुळे एक प्रकारे ही रक्षाबंधनाची भेट असल्याचाही आरोप खडसेंनी केला आहे. राज्याला पहिल्या महिला डीजी मिळाल्या आहेत, त्यांच्याकडून आशा आहे की महिला सुरक्षेवर लक्ष दिलं पाहिजे, महिला अत्याचारांचं प्रमाण वाढत असून राज्यात महिला सुरक्षित नसल्याचंही खडसे म्हणाले आहेत.

‘दाजी-भावजींची कामं माझ्या कार्यकाळात’; चिखलीकरांचा चव्हाण-पाटलांवर घणाघात

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामलल्लाबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात वादंग पेटलं आहे. यावरही खडसेंनी आपली भूमिका मांडली आहे. रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात कोणताही संघर्ष नाही. मी आज आव्हाड यांना वडिलकीच्या नात्याने सांगितलं आहे की, राम सर्वांचाच आहे, त्यामुळे अशी विधान करणं टाळा, असं मी जितेंद्र आव्हाडांना सांगितलं असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.

रावेरमध्ये काँग्रेस 10 वेळा पराभूत :
रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मागील अनेक वर्षांत काँग्रेस रावेर मतदारसंघातून 10 वेळा पराभूत झालं आहे, त्यामुळे आता मतदारसंघ बदलून बघितला पाहिजे, असं खडसेंनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे इच्छूक असून त्यासाठी मतदारसंघ बदलून पाहिला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube