‘दाजी-भावजींची कामं माझ्या कार्यकाळात’; चिखलीकरांचा चव्हाण-पाटलांवर घणाघात

‘दाजी-भावजींची कामं माझ्या कार्यकाळात’; चिखलीकरांचा चव्हाण-पाटलांवर घणाघात

Pratap Patil Chikhlikar : नांदेड जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहेत. खासदार
प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यात घमासान सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांच्यासह त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्कर पाटील खतगांवकर (Bhaskar Patil Khatgoankar) यांच्यावर घणाघात केला आहे. दाजी-भावजींनी जी कामे केली नाहीत, ते कामं माझ्या कार्यकाळात झाल्याचा दावा चिखलीकरांनी केला आहे.

लेट्सअप विश्लेषण : तिसरी बार मोदी सरकार! भाजपचा न डगमगता 400 जागांचा दावा कुणाच्या जोरावर…

चिखलीकर म्हणाले, कॉंग्रेसच्या काळात राजयोग असलेल्या अशोक चव्हाण व भास्कर पाटील खतगावकर या दाजी-भावजींनी जी कामे केली नाहीत, ती माझ्या कार्यकाळात झाली, असा दावा चिखलीकरांनी केला. जे माझ्यावर आरोप करतात त्यांनी काय उद्योग केले. हे सर्वसामान्यांना माहित असल्याचंही चिखलीकरांनी म्हटलं आहे. यावेळी चिखलीकरांचा रोख चव्हाण आणि खतगावकरांवरच होता.

Khurchi Trailer: ‘या सत्तेच्या चक्रव्युहात कोण कोणाला घोडा लावेल? ‘खुर्ची’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

तसेच दाजी भावजींकडे मंत्रिपदे चालून आली होती. मात्र, त्यांनी नांदेडच्या विकासासाठी म्हणावं तसं योगदान दिले नाही. माझ्या कार्यकाळात रेल्वे, रस्त्याच्या कामांसाठी मी पाठपुरावा केला असून त्या पाठपुराव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढील कार्यकाळात नांदेड शहराला पाईपलाईनद्वारे गॅस देण्याची योजना राबवली जाणार असून मी माझ्या कार्यकाळात केलेल्या कामामुळे समाधानी असल्याचं चिखलीकरांनी स्पष्ट केलं आहे.

मसाला क्वीन कमलताई परदेशी काळाच्या पडद्याआड, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आगामी निवडणुकीत मीच जिंकणार…
आगामी निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आल्यास मागील काळात न झालेली कामे मी करुन दाखवणार आहे. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मतदारसंघातल्या घराघरांत अक्षता वाटपाचं काम सुरु असून 22 जानेवारीला आम्ही 2 लाख दिवे लावणार आहोत. आगामी लोकसभा निवडणूक मीच लढवणार असून 100 टक्के जिंकणार असल्याचा दावाही चिखलीकरांनी यावेळी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube