मसाला क्वीन कमलताई परदेशी काळाच्या पडद्याआड, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मसाला क्वीन कमलताई परदेशी काळाच्या पडद्याआड, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kamaltai pardeshi : पुण्याच्या दौंड तालुक्यातील खुटबाव येथील अंबिका मसाला (Ambika masala)केंद्राच्या अध्यक्ष मसाला क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलताई परदेशी Kamaltai pardeshiयांचं निधन झालं आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुणे (Pune)येथील ससून रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दौड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Jr NTR : जपानच्या भूकंपात अडकलेला अभिनेताचं तब्बल 18 तासांनी सुटका होऊन परतला

अंबिका उद्योग समूहाच्या माध्यमातून घरात घरात पोहोचलेल्या कमल परदेशी यांचं ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. खुरपणीच्या कामातून दररोज मिळणाऱ्या पैशांमधून 2000 साली मसाला व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. त्यांच्या माध्यमातून जवळपास 800 महिलांना रोजगार मिळत आहे.

CM शिंदेंच्या निर्णयापूर्वीच नार्वेकरांचा राजीनामा? भाजपच्या चाणाक्यांच्या डोक्यात राजकीय खेळी

कमलताई परदेशी यांच्या निधनानं अनेक गोरगरीब महिलांना छोटे-मोठे उद्योग तयार करून स्वतःच्या पायावर उभा करणाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांनी झोपडपट्टीतून मसाला पदार्थ तयार करून महिला बचत गटाच्या माध्यमातून अंबिका मसाले केंद्र उभारले. त्याला पुढे अंबिका मसाले उद्योगापर्यंत नेले. त्यांनी झोपडपट्टीतून छोटासा मसाला उद्योग सुरू करुन तो सातासमुद्रापार नेला.

त्या स्वतः निरक्षर असूनही त्यांनी आपल्या उद्योगामध्ये मोठी मजल मारली. अपल्या उद्योगाला सातासमुद्रापार नेला. अनेक महिलांना आपल्या पायावर उभा केलं. कोरोनाच्या काळात त्यांच्या मसाला उद्योगाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यावरही मात करुन त्यांनी आपल्या उद्योगाला उभारी दिली.

आज जगभरातून त्यांच्या अंबिका मसाल्याला मागणी आहे. सुरुवातीच्या काळात कमलाताईंनी सरकारी कार्यालयांबाहेर मसाले विकायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळायला लागला. पुढे त्यांनी आपला मोर्चा मुंबईमधील प्रदर्शनांकडे वळवला. कालांतरानं त्यांच्या मसाल्याची विक्री ही बिग बाजारमध्येही सुरु केली. जगभरात त्यांनी आपला अंबिका मसाले ब्रॅन्ड पोहोचवला. विविध देशांनी त्यांच्या कामाची दखल घेतल्याचेही पाहायला मिळते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube