मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचं कामाला वेग; DCM अजित पवारांचे निर्देश
Mumbai-Nashik National Highway : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Nashik National Highway) सुरु असलेल्या विविध कामांमुळे वाहतूक कोडींचा त्रास नागरिकांना होत आहे. वाहतूक नियोजनासाठी उपाययोजना करुन राष्ट्रीय महामार्गाचं काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार यांनी निर्देश दिले आहेत.
‘पंचक’ रिलीज होण्यापूर्वी माधुरी दीक्षित पतीसोबत सिद्धिविनायकाच्या चरणी; पाहा फोटो
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नाशिक-मुंबई महामार्गाच्या दर्जा उन्नतीचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबईला येण्या-जाण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गाच्या सुधारणेचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले पाहिजे. या मार्गावर गर्दीच्या वेळी 1 लाख 70 हजार पॅसेंजर कार युनिट (PCU) एवढी वाहने असतात. त्यामुळे काम करताना अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी समन्वय करुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रस्ते कामाच्या गतिमान कार्यवाहीत आवश्यक सहकार्य करावे, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या आहेत.
नववर्षात वाजला ‘डंकी’चा डंका, शाहरुखच्या चित्रपटाची 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री
तसेच सध्याचा कालावधी रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी अनुकूल असून पावसाळ्यामध्ये रस्ते बांधकामात अडथळे येतात. ‘एमएसआरडीसी’ने रस्त्यावरील खड्डयांची तातडीने दुरुस्ती करावी, हे काम दर्जात्मक होईल याकडे लक्ष द्यावे, काँक्रीटीकरणाच्या कामावेळी वाहतूक व्यवस्था चोख ठेवल्यास अडचण येणार नाही. यादृष्टीने आवश्यक मनुष्यबळ, बॅरिकेट्स यांची उपलब्धता करण्यात यावी. जड वाहनांना वेळेची मर्यादा घालण्यात यावी. अरुंद ठिकाणांचे मॅपिंग करावे, अशा सूचनाही अजित पवारांनी बैठकीत दिल्या आहेत.
दरम्यान, नागरिकांचा त्रास टाळण्यासाठी कामे युद्धपातळीवर पूर्णत्वाला न्यावे. ठेकेदाराकडून गतीने काम होत नसल्यास त्याला काळ्या यादीत टाकून सक्षम ठेकेदाराला काम देण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या आहेत. अजित पवार यांनी आज मंत्रालयात मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार दिलीप बनकर, आमदार रईस शेख यांच्यासह मुख्य सचिव नितीन करीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, आदी उपस्थित होते.