Eknath Khadse : आगामी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकांनाही वेग आला आहे. अशा स्थितीत नेत्यांकडून आता मतदारसंघावर दावे करण्यास झाली आहे. एकेकाळी भाजपचे दिग्गज नेते असलेले आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या संघर्षामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे देखील आता लोकसभा लढवायला तयार आहेत, ते रावेर मतदार संघातून लढणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं की रावेर लोकसभा मतदार संघाचे धनुष्यबाण तुम्ही उचलावं. रावेर मतदार संघ आजवर कॉंग्रेस लढवत आली आहे. १९८९ ते २०१९ या काळात नऊ निवडणूका झाल्या असून या सर्व निवडणूका कॉंग्रेस हारली होती. केवळ एक निवडणूक कॉंग्रेसने १३ महिन्यांसाठी जिंकली होती. कॉंग्रेसला ९ वेळा या मददार संघात हार पत्करावा लागली होती. त्यामुळं ही जागा राष्ट्रवादीने लढवावी, असा पक्षाचा मानस आहे. मात्र, इंडिया आघाडीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय व्हायचा आहे. या बैठकीत जर एनसीपीला ही जागा मिळाली आणि पक्षाने आदेश दिला, तर पक्षाच्या आदेशाचा मी नक्कीच विचार करेल, असं खडसे म्हणाले.
Sukhi Song Out: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ मधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
रावेर मतदार संघावर कॉंग्रेसकडून दावा केला जातो, असं विचारले असता खडसे म्हणाले, आजवर या मतदार संघात नऊवेळा कॉंग्रेस हारली. प्रचंड मतांनी कॉंग्रेसला प्रत्येक वेळेस पराभव पत्करावा लागला. त्यामुळं राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला. मात्र, याबाबतच अंतिम निर्णय व्हायचा आहे. वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल, तोच निर्णय सर्वजण मान्य करतील, असं खडसे म्हणाले.
आज इंडियाच्या समन्वय समितीची दिल्लीत बैठक होणार आहे. यामध्ये जागा वाटप, उमदेवारांनी नावं निश्चीत करणं या मुद्दांवर चर्चा होऊ शकते. याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर खडसे यांनी हे वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तृळात चर्चांना उधान आलं आहे. दरम्यान, सध्या एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे या रावेर मतदारसंघातून खासदार आहेत. एकनाथ खडसेंनी भाजप सोडलं असलं तरी त्यांच्या सून रक्षा खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना रावेरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश दिल्यास 2024 ला रावेरमध्ये सून विरुध्द सासरे अशी लढत पाहायला मिळू शकते.
जयंत पाटील काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वाभिमान सभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, गेल्या 25 ते 30 वर्षात जळगाव जिल्ह्यातील लोकसभेचे दोन्ही खासदार भाजपचे निवडून दिले आहेत. त्यामुळे आता हे कार्य राष्ट्रवादी काँग्रेसने हाती घेण्याची गरज आहे. एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही शिवधनुष्य उचलले पाहिजे, असं पाटील म्हणाले होते.