Eknath Khadse : मागील काही दिवसांपासून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात चांगलंच वाकयुद्ध सुरु असल्याचं चित्र आहे. एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. महाजनांनीही याला दुजोरा खडसेंची पुन्हा भाजपात यायची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. आता मला भाजपमध्ये जायची अजिबात इच्छा नसल्याचं प्रतिउत्तर एकनाथ खडसेंनी दिलंय.
मतांची चोरी करून मुख्यमंत्री फडणवीस जिंकले; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
एकनाथ खडसे पुढे बोलताना म्हणाले, मला भाजपमध्ये जायची आता अजिबात इच्छा नाही. भाजपमध्ये माझी जायची इच्छा होती, मात्र बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम सोबतच्या सलीम कुत्ताबरोबर नाचनाऱ्यांना भाजपात घेतल्यानंतर आता भाजपात गुंडांचं राज सुरु होईल. त्यामुळे भाजपची जी प्रतिमा झाली, त्यामुळे भाजपात जायची इच्छा नसल्याचं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय.
इंग्लंडची विजयी सलामी; भारतावर 5 विकेट्सने मात, शुबमनने फलंदाजांवर फोडल पराभवाचं खापर
तसेच बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांबरोबर काम करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. तसेच महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात एकमेकांविरोधात अविश्वासाचं वातावरण आहे. अजित पवार आम्हाला निधी देत नाही, त्यामुळे महायुतीत भानगडी आहेत. या मुद्द्यावरुन शिंदेंचे बहुसंख्य आमदार नाराज असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलंय.
मी संघाचा स्वयंसेवक, मी संघाच्या विचारापासून कधीही वेगळा गेलो नाही. तुम्ही राष्ट्रवादीत जाऊ नका असं मला कधीही संघाने शिकवलं नाही. संघाचा विचार हा हिंदुत्ववादी आहे, विचार हे राजकीय कधीच नसतात, समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे, ही समाजाची शिकवण असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपात प्रवेश केलायं. याच सुधाकर बडगुजरांवर भाजपने गंभीर आरोप केले होते. सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्तासोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये सुधाकर बडगुजर सलीम कुत्तासोबत नाचत असल्याचं दिसून येत होते. ठाकरे गटाचे नेते बडगुजर यांचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचे गंभीर भाजपकडून करण्यात आले होते. आता बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.