गिरीश महाजन खरंच संकटमोचक, आपत्तीत मार्ग काढतात; बडगुजरांकडून भाषणातच उल्लेख…

Sudhakar Badgujar : भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची संकटमोचन म्हणून ओळख आहे. त्याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा आलीयं. नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी आज भाजपचं कमळ हाती घेतलंय. मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयात दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केलायं. या प्रवेशादरम्यान, बोलताना सुधाकर बडगुजर यांनी मंत्री गिरीश महाजनांचा थेट संकटमोचन असाच उल्लेख केलायं. त्यामुळे गिरीश महाजन हे खरंचच संकटमोचक असल्याचं पुन्हा सिद्ध झालंय.
तुर्कीला दणका! PM मोदींचं विमान सायप्रसला; जाणून घ्या, सायप्रसचं महत्व अन् भारताचा प्लॅन
सुधाकर बडगुजर म्हणाले, भाजपमध्ये आज माझा प्रवेश झालायं, मी त्याबद्दल भाजपच्या नेत्यांचे आभार मानतो. मंत्री गिरीश महाजन खऱ्या अर्थाने संकटमोचक आहेत. महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे. आपत्ती आली की महाजन मार्ग काढतातच, असं सुधाकर बडगुजर भाषणात बोलताना म्हणाले आहेत.
तसेच कोरोना संकटाच्या काळात मी खूप काम केलं. पण नियतीनं अचानक घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने कारवाई केली त्यांना सांगू इच्छितो आता महापालिका निवडणुकीत दूध का दूध पानी का पानी होईल. राज्यात जो पहिला प्रकल्प सांडपाण्यातून वीज निर्मितीचा केला तो मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मुख्यमंत्री एक दूरदृष्टीचे नेते आहेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
…पण धीरूभाईंच्या मागे ईडी नाही लागली; ‘त्या’ वक्तव्यावरून राऊतांचा अजित पवारांना टोला
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मार्ग मोकळा करुन दिल्यानंतर आता कोणत्याही क्षणी निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरात भाजपकडून पक्षप्रवेशाचं धुमशान सुरु आहे. त्यातच आज बबन घोलप, सुधाकर बडगुजर यांनी भाजप नेते रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजनांच्या उपस्थितीत प्रवेश केलायं.
काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊस इब्राहिमचा साथीदार असलेला सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचे फोटो व्हायरल झाले होते. बडगुजर यांचे कुत्तासोबत संबंध असल्याचा थेट आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यावेळी बडगुजर हे उद्धव ठाकरे गटात होते. पक्षफुटीनंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम राहिले. पण पक्षात सन्मान होत नसल्याचा आरोप करीत त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलायं. त्यांनी आता आपल्या हाती कमळ घेतलंय.