Hasan Mushrif : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आजारी असल्याचे वृत्त आलं होतं. त्यांना डेंग्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. आपण आजारी असल्याचं सांगत दिवाळीत कुणालाही भेटणार नाही, असं खुद्द अजित पवारांनी सांगितलं. मात्र, त्यांना जरा बरं वाटल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांसोबत दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यांनी घेतलेल्या या भेटीमुळ राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, यावरूनच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांच्या जोरदार टोलेबाजी केली. आता मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर, दिवाळीत बहिण-भावांचं बाँडिंगही दिसले !
ऐन मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतांना अजितदादा आजारी पडले होते. जरांगे पाटलांनी वेळ वाढवून दिल्यावर अजित दादांनी दिल्लीतील भाजप नेतृत्वाची भेट घेतली. काल उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य केलं होतं. अजितदादांशी माझा संपर्क नाही. त्यामुळं त्यांना कोणता ताप आहे, हे माहित नाही, त्यांना ताप आहे की, सहकाऱ्यांचा मनस्ताप आहे हे त्यांनाच माहिती, अशा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता.
दरम्यान, आज माध्यमांशी बोलतांना उद्धव ठाकरेंनी अजितदादांवर केलेल्या टीकेविषयी विचारलं असतात मुश्रीफ म्हणाले की, अजित पवार हे कधीही नाटक करणारे नेते नाहीत. ते आत एक आणि बाहेर एक असं कधी वागत नाहीत. अजित दादा हे खरोखरच आजारी आहेत. त्यांना डेंग्यू झाला आहे. खुद्द अजित दादांनीही याबबद्दल सांगितलं आहे, असं मुश्रीफ यांनी म्हटलं.
Sushma Andhare : सुषमाताईंचे राजकीय फटाके! भुईचक्र नवनीत राणांचं अन् फुलबाजा..
मराठा आरक्षणाच्या मुद्दाला मंत्री छगन भुजबळांचा विरोध असल्याचं दिसतं. यावरही मुश्रीफ यांनी भाष्य केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हे छगन भुजबळ यांचं देखील मत आहे. मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, असं त्यांचं म्हणणं आहे. जातनिहाय जनगणनेनंतर दूध का दूध पानी का पानी होईल, असेही मुश्रीफ म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कोणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. त्यावेळी शरद पवार गटाने मोठे दावे करत अजित पवार गटावर गंभीर आरोप केले होते. अजित पवार गटाने आयोगासमोर दाखल केलेले 20 हजार प्रतिज्ञापत्र बनावट असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची शरद पवार गटाने केली. यावरून मंत्री मुश्रीफांनी शरद पवार गटावर केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा आहे. आमचा निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला खात्री आहे की, आम्हाला न्याय मिळेल. चिन्ह आमच्याकडे राहील. उरला प्रश्न प्रतिज्ञापत्र योग्य की अयोग्य. तर ते सांगण्याचा अधिकार कोणत्याही नेत्याला नाही, तो निवडणूक आयोगाला आहे, मंत्री मुश्रीफ म्हणाले.