Download App

शरद पवार आता शिवनेरीवरून तुतारी फुंकणार; जयंत पाटलांनी केली शिवस्वराज्य यात्रेची घोषणा

शिवस्वराज्य यात्रा 9 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावरून सुरू होणार असून महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा जनेतपुढे पर्दाफाश करू - पाटील

  • Written By: Last Updated:

Jayant Patil : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीच (Vidhansabha Election) बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. शरद पवार गटाही विधानसभ निवडणुकीच्या कामाला लागला आहे. नुकतीच शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती सांगत शिवस्वराज्य यात्रा 2 ची घोषणा केली. त्यामुळं शरद पवार आता शिवनेरीवरून तुतारी फुंकणार असल्याचं स्पष्ट झालं.

Tata Curvv EV ने बाजारात घेतली कडक एन्ट्री, देणार 585Km रेंज, किंमत आहे फक्त … 

शिवस्वराज्य यात्रा 9 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावरून सुरू होईल. या माध्यमातून महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा जनेतपुढे पर्दाफाश करू, असा इशारा त्यांनी दिला.

जयंत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी शिवस्वराज्य यात्रा-2 ची घोषणा केली. यावेळी त्यांनी या यात्रेचा टीझर आणि लोगोचे प्रकाशनही केले. यावेळी पाटील यांच्यासह खासदार अमोल कोल्हे, अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारे आदी उपस्थित होते.

जिला पराभवाची धूळ चारली तिलाच फायनलची लॉटरी; ‘विनेश’च्या जखमेवर मीठ 

यावेळी बोलतांना पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 9 ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशिर्वाद घेईल. त्यानंतर महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा-2 सुरू होणार आहे. जुन्नर येथून या यात्रेला सुरूवात होईल. 9 ऑगस्ट रोजी इंग्रजांविरोधात चले जावचा नारा देण्यात आला होता. तसेच या दिवशी जागतिक आदिवासी दिनही आहे. त्यामुळे यात्रा सुरू करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला. त्यानुसार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता ही यात्रा सुरू होईल. अमोल कोल्हे हे प्रमुख प्रचारक आहेत, असं पाटील म्हणाले.

Assembly Elections 2024 : मनसेचा तिसरा उमेदवार जाहीर; वाचा, कोण कुठून उतरणार मैदानात? 

सरकारच्या काळे कारनामे घेऊन जनता दरबारात जाणार
पाटील म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत राज्य सरकारच्या धोरणांमुळे राज्य अधोगतीला जाण्यास सुरूवात झाली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारील राज्ये आपल्या तरुणांच्या नोकऱ्या हिसकावून घेत आहेत. हे सर्व सुरू असताना सत्ताधारी हतबलपणे बसले आहेत. त्यामुळे महायुती सरकारच्या काळ्या कारनामे घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुती सरकार घाबरलं….
पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारवर जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीने राज्यातील 48 पैकी 31 जागा जिंकल्या. तर महायुतीचा जनतेनं पराभव केला. महाराष्ट्रातून यांना आपण हद्दपार करू शकतो हे जनतेनं दाखवून दिलं. आताही बहाद्दर जनतेने महायुती सरकारला सत्तेवरून खेचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार घाबरून सरकारी तिजोरी मोकळी करत विविध योजना सुरू करत आहे. अशा घोषणाही जनतेला पटत नसल्याचं पाटील म्हणाले.

follow us