रामराजेंना दिल्लीत पाठविणार : जयंत पाटलांकडून माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर

Jayant Patil On Ramraje Nimbalkar :  विधान परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा आज ७५वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवार आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना जयंत पाटलांनी रामराजे निंबाळकर यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर करुन टाकली आहे. रामराजे निंबाळकर […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 09T224959.833

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 09T224959.833

Jayant Patil On Ramraje Nimbalkar :  विधान परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा आज ७५वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवार आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना जयंत पाटलांनी रामराजे निंबाळकर यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर करुन टाकली आहे.

रामराजे निंबाळकर यांनी आता दिल्लीत जायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारकडून करायचे तेवढं काम त्यांनी केलं आहे. आता उरलेले केंद्रात जाऊन केले पाहिजे, असे पाटील म्हणाले आहे. त्यामुळे आता रामराजे निंबाळकर हे २०२४ साली माढ्यातून लोकसभेची निवडणुक लढणार हे स्पष्ट झाले आहे. माढ्यातून सध्या रणजितसिंह निंबाळकर हे भाजपचे खासदार आहेत. रामराजे व रणजितसिंह यांच्यातील वाद सर्वश्रूतच आहे. त्यात आता हे दोन्ही नेते लोकसभेला आमने-सामने आल्यास आणखी चुरश पहायला मिळेल.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरुन जुंपली, फडणवीसांचा थेट आव्हाडांना इशारा

दरम्यान, यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी रामराजे यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. रामराजे निंबाळकर यांनी फलटणाच्या कानाकोपऱ्यात विकासाची गंगा पोहोचवली. त्यांनी अखंडपणे, अविरतपणे या जिल्ह्यातील लोकांची सेवा केली. परिणामी या भागातील जनतेने त्यांना विधानसभेत पाठवले. १९९५ साली या जिल्ह्यात अशी परिस्थिती होती की पाच आमदार अपक्ष म्हणून निवडून आले होते. राजे त्यापैकी एक होते.

पक्षासाठी कसरत करणाऱ्यांनी दुसऱ्यावर बोलूच नये; फडणवीसांचा पुन्हा पवारांना टोला

नवे सरकार स्थापन करत असताना त्यांनी या पाच आमदारांची मोट बांधण्याचे काम केले आणि सरकारवर दबाव आणला. परिणामी याच व्यासपीठावर कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करण्यात आले आणि याच व्यासपीठावरून त्यांची महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले आहे.

Exit mobile version