Download App

सुधीर मुनगंटीवारांची विधानं चुकीची; जयंत पाटलांचा पलटवार

Jayant Patil On Sudhir Mungantiwar : राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांच्या राजीनाम्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार रणकंदन सुरु आहे. शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी सत्र सुरु आहे. पवारांचा निर्णय बदलण्यासाठी हरेक पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी भाजप नेते (BJP Leader)आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

IPL 2023, GT vs DC : प्लेऑफच्या शर्यतीत दिल्ली कायम, करो या मरोच्या सामन्यात गुजरातला नमवलं

यावेळी पत्रकारांनी जयंत पाटील यांना प्रश्न केला की, सुधीर मुनगंटीवारांचं म्हणणं असं आहे की, जे पद अस्तित्वातच नाही, त्या पदाचा राजीनामा दिला म्हणजे असं काय केलंय शरद पवार यांनी, त्यावर जयंत पाटील म्हणाले की, मुनगंटीवारांचा वारंवार राष्ट्रवादीबद्दल बोलताना तोल का जातो? तेच मला कळत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्निकल मुद्दे उपस्थित करुन राजकारण होत नसतं.

राजकारण हे लोकांच्या समाजाच्या मनावर आणि मानन्यावर असतं, सुधीर मुनगंटीवारांची चार दिवसांपासून विधानं मी ऐकतोय. तर त्या विधानांमध्ये राष्ट्रवादीबद्दल प्रचंड तिरस्कार दिसत आहे. ते चुकीची विधानं करत आहेत. ते राज्याचे जबाबदार मंत्री आहेत. आमच्या पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

राज्यात आणि देशातल्या विविध भागात पवार साहेबांना माणणारे नेते, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्यावर आम्हाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळणारच आहे. आम्ही आता कर्नाटकमध्ये आम्ही निवडणुका लढवत आहोत. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष होणं आणि त्याची मान्यता मिळणं हे औपचारिकपणा आहे.

देशातील सगळ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असावेत अशी पहिल्यापासूनच भूमिका घेतली आहे. आजही आहे, आज पवार साहेबांनी राजीनामा दिला आहे, त्यावर योग्य ती चर्चा त्यांनी नेमलेली समिती घेणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

Tags

follow us