Download App

मनुपेक्षा तुकाराम, ज्ञानेश्वरांना छोटे म्हणणारा भिडे ‘त्यांचा’ गुरुजी; जितेंद्र आव्हाडांचा रोख कोणाकडे?

मनूपेक्षा संत तुकाराम, ज्ञानेश्वर छोटे म्हणणणारा संभाजी भिडे(Sambhaji Bhide) त्यांचा गुरुजी असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, बीडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमानी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी जितेंद्र आव्हाडांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

Tirupati Balaji च्या दर्शनाला जाताना घ्यावी लागणार ‘ही’ काळजी

आव्हाड पुढे बोलताना म्हणाले, देशात आणि राज्यात सध्या अवघड परिस्थिती सुरु आहे. तो भिडे म्हणतो माझ्या मनूपेक्षा संत तुकाराम, ज्ञानेश्वर छोटे आहेत. ज्या तुकारामांनी महाराष्ट्र विचारांनी घडवला ते भिडेला मान्य नाहीत, आणि तो भिडे त्यांचा गुरुजी आहे गुरुजी, असं आव्हाड म्हणाले आहेत.

स्वदेशी युद्धनौका ‘विंध्यगिरी’चे उद्या उद्घाटन, नौदल आणखी होणार मजबूत

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, भिडेंच्या वादग्रस्त विधानावर विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. त्यावेळी संभाजी भिडे हे आमचे गुरुजी असल्याचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलं होतं. त्यांच्या या विधानाचा आज जितेंद्र आव्हाडांनी समाचार घेतला आहे.

“ठाकरेंसोबत झाले ते माझ्यासोबतही होऊ शकते” : आयोगाच्या निर्णयावर पवारांनी व्यक्त केली भीती

तसेच एकीकडे मोदी म्हणतात हर घर तिरंगा अन् इकडे भिडे म्हणतो फाड दो तिरंगा. कोणाचं खरं मानायंच मोदी की भिडे? सवाल उपस्थित करीत आव्हाडांनी टीकास्त्र सोडलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त संभाजी भिडे यांनी सांगलीत पदयात्रा काढली होती. राष्ट्राचा राष्ट्रध्वज भगवा असावा, या मागणीसाठी ही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेदरम्यान कार्यकर्त्यांकडून अनेक घोषणा देण्यात आल्या होत्या.

पवारांना ऑफर देण्याइतके अजितदादा मोठे नाही; राऊतांनी दाखवली जागा

दरम्यान, राज्यात सध्या उलट-सुलट वातावरण सुरु असून हे वातावरण ताब्यात घेऊन बदलावं लागणार आहे. कोटी-कोटी रुपये देऊन आमदार विकत घेतले जात आहेत, असा आरोपही जितेंद्र आव्हाडांनी यावेळी केला आहे. बीडकरांनी साहेबांना 6 आमदार निवडून दिले. पण 1980 सालचे आमदार 1986 मध्ये साहेबांसोबत नव्हते. त्यानंतर साहेबांनी दुसरे आमदार उभे केले, तेव्हा सहा आमदार बीडने राष्ट्रवादीला दिले असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

आव्हाड यांच्या भाषणाच्या शेवटी उपस्थितांनी हात वर करुन आम्ही शरद पवार साहेबांसोबतच असल्याचा विश्वास देत 2024 ला इंडिया भारताचं राजकारण उलटून टाकणार असल्याचा विश्वासही जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us