Nawab Malik : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आता पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसून येणार आहेत, एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या मैदानातही दिसणार आहेत. कारण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन वाढवला आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप आला नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन वाढवला आहे. त्यामुळे आता नवाब मलिक यांचा निवडणूक लढवण्याचाही मार्ग मोकळा झाला असल्याचं दिसून येत आहे.
BREAKING: Supreme Court makes absolute the interim medical bail granted to NCP leader Nawab Malik till disposal of regular bail plea before the Bombay High Court.#SupremeCourt @nawabmalikncp pic.twitter.com/Tfe6CD56l2
— Bar and Bench (@barandbench) July 30, 2024
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना जामीन मंजूर केलायं. आजारपणाचा आधार घेत न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. ED ने फेब्रुवारी 2022 मध्ये मलिकला गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यांना किडनीच्या आजाराबरोबरच इतरही अनेक आजारांनी त्रस्त असल्याचे सांगत मलिक यांनी उच्च न्यायालयाकडे दिलासा मागितला होता.