Download App

NCP : महायुतीचं सरकार आल्यास अजितदादा CM? पटेलांचं सूचक उत्तर

NCP : पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर (NCP) आता अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे सीएम होतील अशा चर्चांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि नेत्यांची वक्तव्ये पाहिली तर राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होईल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ नेते मात्र एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात पुढील निवडणुका लढवल्या जातील असे सांगत आहेत. या घडामोडींवर आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या या खुलाशानंतर राज्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या (NCP) तत्कालीन सर्व मंत्र्यांसह सर्व आमदार जून 2022 मध्येच भाजपसोबत यायला तयार होते. त्यांनी तसे शरद पवार यांना लेखी दिले होते, असा दावा पटेल यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. राज्यात महायुतीचे सरकार आल्यास अजित पवार मुख्यमंत्री होतील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर पटेल म्हणाले, पुढे काहीही घडू शकते. पण, सध्या एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत. शिंदेंना भाजपानेच मुख्यमंत्री बनवले आहे.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला धक्का! आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबली

आम्ही तेव्हाच मुख्यमंत्रीपद मागितलं होतं

यानंतर पटेलांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना राष्ट्रवादीबाबत काय घडामोडी घडल्या याचाही खुलासा केला. ते म्हणाले, महाविकास आघाडीत राष्ट्रवादीसाठी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. शिवसेनेकडे 56 तर राष्ट्रवादीकडे 54 आमदार आहेत. त्यामुळे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणी केली होती. दुसरा प्रस्ताव उद्धव ठाकरेंकडे ठेवला होता. त्यानुसार तीन वर्षे शिवसेना आणि दोन वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राहिल असे त्या प्रस्तावात म्हटले होते.

भाजपबरोबर जाण्यासाठी 51 आमदार तयार होते

राज्यात ज्या वेळेस महाविकास आघाडी सरकार कोसळून ज्यावेळेस एकनाथ शिंदे सूरत, गुवाहाटी, गोव्यात फिरत होते. त्यावेळी राष्ट्रवादी भाजप शिंदेंसोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी करत होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे 53 आमदार अनिल देशमुख, नवाब मलिक जेलमध्ये असल्याने त्यांना वगळता 51 आमदार भाजप, शिंदेंसोबत सत्तेत जाण्याची तयारी करत होते. यावेळी सर्व आमदारांनी भाजप आणि शिंदेंसोबत सत्ता स्थापन केली पाहिजे असा प्रस्ताव ठेवला होता. यावर मात्र कुणीच चर्चा करत नाही, असेही पटेल म्हणाले.

मनोज जरांगे 50 खोक्यांची ऑफर? आंदोलन मॅनेजबद्दल जरांगेंनी स्पष्टच सांगितलं

Tags

follow us