‘इजा कानाला नाही तर’…; रोहित पवारांची फडणवीसांवर मिश्किल टिप्पणी

Rohit Pawar On Eknath Shinde and Devendra Fadanvis :  शिवसेनेकडून काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केलेल्या जाहिरातीवरुन राजकारण ढवळून निघालं होतं. कालच्या जाहिरातीवरुन भाजपमध्ये नाराजी तर विरोधकांकडून टीका-टिपण्या केल्या जात असल्याचं दिसून आलं होतं. जाहिरातबाजीवरुन शेकल्यानंतर आता आज शिवसेनेकडून सारवासारव करण्यात आलीय. आज प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, पतंप्रधान नरेंद्र मोदी […]

Letsupp Image   2023 06 14T105630.201

Letsupp Image 2023 06 14T105630.201

Rohit Pawar On Eknath Shinde and Devendra Fadanvis :  शिवसेनेकडून काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केलेल्या जाहिरातीवरुन राजकारण ढवळून निघालं होतं. कालच्या जाहिरातीवरुन भाजपमध्ये नाराजी तर विरोधकांकडून टीका-टिपण्या केल्या जात असल्याचं दिसून आलं होतं. जाहिरातबाजीवरुन शेकल्यानंतर आता आज शिवसेनेकडून सारवासारव करण्यात आलीय. आज प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, पतंप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो प्रकाशित करण्यात आले आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावर मिश्किल टिप्पणी केली आहे.

इजा ‘कानाला’ झालेली नव्हती तर ‘मनाला’ झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी. असो!, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Shivsena Advertisement : शिवसेनेने कालची चूक सुधारली! फडणवीस अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापून सारवासारव

यामुळंच राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय… यांच्या काही नेत्यांना पदं मिळाली पण सामान्य नागरिक मात्र अडचणीत आलाय.. सरकार केवळ जाहिरातीतच दिसत असल्याने बेरोजगारांनी नोकरी आणि भाकरीऐवजी यांच्या जाहिरातीच पाहत बसायचं का?, असे म्हणत शिंदे व फडणवीसांना सुनावले.

दरम्यान, काल सर्व वृत्तपत्रांमध्ये ‘राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर फडणवीसांनी काल आपला कोल्हापूरचा दौरादेखील रद्द केला होता. यावर शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी फडणवीसांचा कान दुखत असल्याने ते हेलकॉप्टरने प्रवास करणार नसल्याचे म्हटले होते.

Exit mobile version