Download App

Maharashtra Politics : ‘कारभारी जरा दमानं’; सुनील तटकरेंचा नाना पटोलेंना सल्ला

  • Written By: Last Updated:

Sunil Tatakare On Nana Patole :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार सुनील तटकरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान पटोले ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना टोला लगावला आहे. यावेळी तटकरे हे एका मुलाखतीत बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदीवर भाष्य केले आहे. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी जबाबदारीने विधान केल्यास आम्ही लोकसभेला भाजपपेक्षा अधिक जागा जिंकू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जे आत्ता बोलत आहेत ते बोलणं थांबवल तर महाविकास आघाडी अधिक जागा जिंकू शकेल. संजय राऊत यांनी बोलण्याच्या बाबतीत संयम बाळगला पाहिजे. असे माझे वैयक्तीक मत आहे. काही वेळेला त्यांच्याकडून अनावश्यक टिप्पणी होते. दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलण्याचा किंवा लिहण्याचा अधिकार हा एका सक्रीय पक्षातील नेत्याला नाही, अशा शब्दांमध्ये तटकरेंनी राऊतांना फटकारले आहे. ते शिवसेनेचे खासदार आहेत, सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे, त्यामुळे त्यांनी आपलं अनावश्यक बोलणं टाळलं पाहिजे.

Amol Kolhe : जयंत पाटलांना भावी मुख्यमंत्री म्हणणारे कोल्हे म्हणाले, अजितदादा होते म्हणून…

तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील खोचक टोला लगावला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे देखील काही वेळा शरद पवारांवर अनावश्यक टिप्पणी करतात. मी त्यांना सल्ला देईल कारभारी जरा दमानं, असा टोला त्यांनी पटोलेंना लगावला आहे. तसेच काही गोष्टींना आवर घातला गेला तर बरं आहे, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना सुनावले आहे.

पक्षासाठी कसरत करणाऱ्यांनी दुसऱ्यावर बोलूच नये; फडणवीसांचा पुन्हा पवारांना टोला

Tags

follow us