Download App

महादेव जानकरांचा महायुतीला ‘रामराम’! महायुती सोडतील असं वाटत नाही; तटकरेंची पहिली प्रतिक्रिया

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर महायुती सोडतील असं वाटत नाही, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी दिलीयं.

Sunil Tatkare News : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांनी महायुतीला रामराम केला असल्याची माहिती समोर आलीयं. महायुतीला रामराम विधानसभा निवडणुकीत करत ‘एकला चलो रे’चा नारा महादेव जानकरांनी दिलायं. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार उभे करणार असल्याचं जानकरांकडून स्पष्ट करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीयं. महादेव जानकर महायुती सोडून जातील वाटत नसल्याचं तटकरेंनी म्हटलंय. त्यामुळे आता महादेव जानकर महायुतीत राहणार की स्वबळावर निवडणूक लढवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

‘पिपाणी’ चिन्हाचा त्रास होऊ शकतो; पण, लोकसभेएवढा नाही; पवारांच्या नातवाला फुल्ल विश्वास

सुनिल तटकरे म्हणाले, महादेव जानकर महायुती सोडतील असं वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत महादेव जानकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्याग केला आहे, नाहीतर राजेश विटेकर आज आपल्याला लोकसभा सदस्य म्हणून पाहायला मिळाले असते, पुन्हा एकदा महायुतीचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील, असं सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.

जरांगेंनी शड्डू ठोकला! मुलाखतींसाठी अंतरवालीत या; लढायचं की, पाडायचं यावर 20 तारखेला फैसला

महादेव जानकर यांनी महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केलीयं. जानकरांनी आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचाही नारा दिला आहे. जानकरांनी महायुतीकडे विधानसभेसाठी 40 ते 50 जागांची मागणी केली होती. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे महादेव जानकर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आता जानकरांनी महायुतीला सोडचिठ्ठी देत विधानसभेसाठी एकला चालो रे चा नारा दिला आहे.

Assembly Election : अर्ज भरायला 6 अन् बंडखोराला थंड करण्यासाठी 4 दिवस; 39 दिवसांत निवडणूक संपणार

दरम्यान, विधानसभेसाठी सध्या महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चांमध्ये महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या जानकारांच्या रासपने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटपांच्या चर्चांमध्ये रासपला सामावून घेतले नाही अशी तक्रार जानकरांची आहे. याबाबतची नाराजी जानकरांनी बोलून दाखवली असून, आगामी काळात होणाऱ्या विधानसभांसाठी रासपनं महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.

follow us