Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर कर्जत (NCP News) येथे सुरू आहे. या शिबिरात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी काही धक्कादायक गौप्यस्फोट केले. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच निवडणूक आयोगातील युक्तिवादात शरद पवार गटाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल वापरलेला एक शब्द त्यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. आज याच शब्दावरून तटकरे यांनी शरद पवार गटाला चांगलेच सुनावले. निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या युक्तिवादासंदर्भात तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. या युक्तिवादात अजित पवार यांना भेकड म्हटले गेल्याचे तटकरे म्हणाले. अजित पवार भेकड असते तर हे सरकार आले असते का? असा सवाल तटकरे यांनी केला.
अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचंय ही जनतेची इच्छा; सुनील तटकरेंचं मोठं विधान
सध्या सर्वांच्या टीकेचे लक्ष्य अजितदादा आहेत. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल्यानंतर आम्ही मंत्र्यांना भेटलो. महिनाभर वाट पाहिली. तरीही अजितदादा टीकेचे लक्ष्य होत आहेत. निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान युक्तिवाद झाला. त्यात ‘कावड’शब्द वापरला गेला. या शब्दाचा मराठीतील अर्थ तिखट असा होतो. परंतु, तो तुम्हाला माहिती हवा. कावड या शब्दाचा अर्थ भेकड असाही होतो. अजित पवार जर भेकड असते तर हे सरकार आणण्याची हिंमत दाखवू शकले असते का असा सवाल करत आपण दाखवून देऊ की अजित पवार यांनी घेतलेला निर्णय कसा योग्य होता, असे तटकरे म्हणाले.
त्यावेळी पक्षानं अजितदादांची बाजू घेतली नाही
2004 साली मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला असता. परंतु तसं होऊ दिलं नाही. ते का नाही होऊ दिलं नाही याचं स्पष्टीकरण अजितदादा तुम्ही आता द्यायला हवं. अशोक चव्हाण, विलासराव देशमुख यांनी आघाडी सरकार चांगलं चालवलं. परंतु पृथ्वीराज चव्हाण 2010 साली मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बदल झाला. अजित पवार यांच्यावर 2009 नंतर टाइम्स ऑफ इंडिया मध्ये टीका सूरू झाली. त्यावेळीं पक्षाने तुमची बाजू घ्यायला हवी होती. परन्तु पक्षाने ती घेतली नाही याचं मला वाईट वाटलं, असे तटकरे म्हणाले.
पक्षाच्या जडणघडणीत अजितदादांचं योगदान
मी ज्यावेळी मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यानंतर अजित पवार यांनी मला अध्यक्ष करावं असं सांगितलं. निवडणूक आयोगासमोर सांगितलं अजित पवार यांनी काहीचं केलं नाही. मला त्यांना सांगायचं आहे की अजित पवार यांचा पक्षाचा जडणघडणमध्ये मोठा हात आहे . वेगवेगळ्या कार्यक्रमात सांगितलं जातं 2019 सालची निवडणुक युतीला बहुमत देणारी होती. कौल अर्धा भाजप आणि अर्धा शिवसेनेच्या विरोधात जनतेने दिला होता. सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकाराला पाठींबा दिला हे अघटीत होतं. पहाटे शपथविधी झाला तो का झाला हे अजित पवार यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. जे आता सोबत नाहीत ते देखील अजित पवार यांच्यासोबत होते.