Amol Mitkari replies Amol Kolhe : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरू. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शरद पवार गटाती शेतकरी सन्मान यात्रा सुरू आहे. या यात्रेची सभा बारामत तालुक्यातील काटेवाडीत पार पडली. या सभेत अमोल कोल्हे यांनी अजितदादांवर जोरदार टीका केली. त्यांची टीका अजित पवार गटातील नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी कोल्हेंवर जोरदार पलटवार केला आहे. अजित पवारांवर बोलताना थोडं सबुरीनं घ्यावं. बारामतीची लोकं हुशार आहेत. येणाऱ्या काळात काय केलं पाहजे हे बारामतीच्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे वेट अँड वॉच.. अजित पवारांशी बरोबरी करू नका असा इशारा मिटकरी यांनी दिला.
Amol Kolhe : ‘बात निकली है तो दूर तक जाएगी’ कोल्हेंनीही अजितदादांना घेरलंच
या सभेत खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना निशाण्यावर घेतलं होतं. वाघ जंगलात फिरत असला की राजा वाटतो. मात्र सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर कसरती करत असताना आपल्या काळजाला वेदना होतात. महाराष्ट्राच्या हितासाठी डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्दही काढत नाहीत तेव्हा ही भावना नक्कीच जागी होते, असा टोला अमोल कोल्हेंनी लगावला होता.
त्यांच्या याच वक्तव्यावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार पलटवार केला. मिटकरी म्हणाले, अमोल कोल्हेंसारख्या अतिसामान्य व्यक्तीला शिरुरमधून उमेदवारी देऊन अजितदादांनी वाघ बनवलं. पण, आता कोल्हेंनी काटेवाडीत जाऊन अजित पवारांची सर्कशीतील वाघाशी तुलना करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या या उत्तुंग बुद्धिमत्तेवर हसू येतं. कोण जंगलातलं आणि कोण सर्कशीतलं हे महाराष्ट्राला माहिती आहे, अशी टीका मिटकरी यांनी केली.
Ajit Pawar : मी शिरुरबाबत जे सांगितलं तेच फायनल.. थेट मतदारसंघात येत अजितदादांनी ठणकावलं!
अजित पवारांवर बोलताना थोडं सबुरीनं घ्यावं. बारामतीची लोकं हुशार आहेत. येणाऱ्या काळात काय केलं पाहजे हे बारामतीच्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे वेट अँड वॉच.. अजित पवारांशी बरोबरी करू नका असा इशाराही मिटकरी यांनी दिला. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर आता खासदार कोल्हे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.