Download App

अजित पवार निर्णय घेण्याच्या तयारीत; आमदार अण्णा बनसोडेंनी थेटचं सांगितलं

NCP MLA Anna Banasode On Ajit Pawar :  राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असून, ते भाजपशी हातमिळवणी करण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात अजित पवार यांचे आजचे पुण्यातील कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. दोन आठड्यांपूर्वीदेखील अजित पवारांनी त्यांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द केले होते. त्यावेळी अजित पवार काही आमदारांसह नॉटरिचेबल असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली होती. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

आता पुन्हा एकदा अजितदादा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मोठे विधान केले आहे. अजितदादा जो निर्णय घेतली तो आम्हाला मान्य असेल, असे ते म्हणाले आहेत. मागील सत्तासंघर्षाच्या काळातदेखील मी अजितदादांच्या बरोबर होतो व इथून पुढेही मी त्यांच्यासोबतच राहील असे ते म्हणाले होते. यावेळी ते टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

अजितदादांना कसं ट्रॅक कराल?; सुप्रिया सुळेंनी दिली आयाडिया!

यावेळी अण्णा बनसोडे यांनी अजितदादा भाजपमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न विचारला होता. तेव्हा अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान, अण्णा बनसोडे हे मुंबईला अजित पवार यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. त्यावेळी बैठकीत जे ठरेल ते सगळ्यांना कळेल, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

अजित पवार ‘देवगिरीत’ चं; कार्यक्रम रद्द करण्याचे समोर आले स्पष्टीकरण

यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपमध्ये विचारधारेचा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या विचारधारेवर  कोणीही काम करणार असेल तर आम्ही सगळ्यांना पक्षात घेऊ, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे राजकीय प्रश्नांना उधाण आले आहे.

Tags

follow us