Download App

Jitendra Awhad : ‘नवीन पक्ष काढा, कतृत्व सिद्ध करा’; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत आव्हाडांचं अजितदादांना चॅलेंज!

Jitendra Awhad vs Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्जत खालापूर येथील विचारमंथन शिबिरात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठीचं आंदोलन शरद पवार (Sharad Pawar) यांच्याच सांगण्यावरून झालं असा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. यांसह अन्य धक्कादायक खुलासे त्यांनी आपल्या भाषणात केले. अजितदादांच्या या वक्तव्यांवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवारांना घेरलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ समोर आणला आहे. या व्हिडिओत अजित पवार शिवसेनेतून फुटून गेलेल्या शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत.

आव्हाड यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून (आधीचे ट्विटर) हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘दादा तुम्ही महाराष्ट्राला कायम स्वतःची ओळख करुन देत आलात की मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. प्रसंगी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी. शिवसेना फुटल्यानंतर केलेल्या भाषणात आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्रिमंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना दिलेला हा सल्ला होता. या सल्ल्याप्रमाणे आपण वागलात तर महाराष्ट्रात आपले कौतुक होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी दिला. त्याचं पालन पोषण ही पवार साहेबांनी केलं. त्याचं संगोपन पुढे पवार साहेबांनीच केलं. राष्ट्रवादी पक्ष वाढला हा देखील पवार साहेबांमुळेच आणि तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात. मग, जसं आपण म्हटलात तसं घ्याना आणि एक नवीन पक्ष काढा, नवीन निशाणी घ्या आणि स्वतःचं कर्तुत्व सिद्ध करून दाखवा’, असा खोचक सल्ला आव्हाड यांनी दिला आहे.

शिवसेना फुटीवर काय म्हणाले होते अजित पवार ?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना उद्देशून केलेल्या भाषणात अजित पवार म्हणाले होते, की तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष.. तुम्हाला कुणी अडवलं होतं. ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला. ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला. महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचविला. त्यांचाच पक्ष काढून घेतला. त्यांचंच चिन्ह काढून घेतलं. हे जरी निवडणूक आयोगानं दिलं असलं तरी जनतेला पटतंय का, याचाही विचार झाला पाहिजे.

Jitendra Aavhad : भगीरथ बियाणींचा मृत्यू कसा झाला? आव्हाडांची मुंडेंवर ‘त्या’ प्रकरणावरून टीका

Tags

follow us