Jitendra Aavhad : भगीरथ बियाणींचा मृत्यू कसा झाला? आव्हाडांची मुंडेंवर ‘त्या’ प्रकरणावरून टीका
Jitendra Aavhad : शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Aavhad) यांनी अजित पवार गटातील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती बीडमधील भगीरथ बियाणी या प्रकरणावरून चांगलीच टीका केली आहे. दरम्यान त्या अगोदर धनंजय मुंडे यांनी आव्हाडांवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कर्जतमध्ये सुरू असलेल्या शिबिरातून हल्लाबोल केला होता. त्यावर आव्हाड यांनी हा पलटवार केला आहे.
आव्हाडांचा मुंडेंना इशारा…
या शिबिरामध्ये बोलताना मुंडे म्हणाले होते की, खरी राष्ट्रवादी ठाण्यातून फोडण्यात आली आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी एक पत्रकार परिषद मुंडेंवर टीका केली. यावेळी त्यांनी बीडमधील एक प्रकरण समोर आणलं. ते म्हणाले की, काकाच्या पाठीत सुरा कोणी मारला? तुम्हाला राजकीय जन्मही काकांनीच दिलाय. मात्र तुम्हाला चुलत बहीणही नकोशी झाली होती. तर तिच्या घरी जाऊन मला ओवाळ असं कशाला म्हणता. असं म्हणत त्यांनी पंकजांवरूनही टीका केली.
Maratha Reservation : सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजे भुजबळ; होमग्राउंडमध्ये जरांगेंची पुन्हा टीका
त्याचबरोबर बीडमधील भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली? त्यांच्या मुलीला कोणी छेडलं होतं? ज्या अत्याचाराला कंटाळून भगीरथ बियाणे यांनी आत्महत्या केली होती का? त्यानंतर आता देखील परळीमध्ये मुंडे नावाचा एक मुलगा मारला गेलाय. त्याचा गुन्हा देखील नोंदवला गेलेला नाही. मी अशा प्रकरणावर बोलत नाही. मात्र माझं नाव घ्याल तर मी शांत बसणार नाही. असा इशारा देखील यावेळी आव्हाडांनी आणि धनंजय मुंडेंना दिला.
Menstrual Hygiene Rules : संसर्ग टाळण्यासाठी मासिक पाळीदरम्यान स्वच्छता कशी राखावी? LetsUpp Marathi
दरम्यान भगीरथ बियाणी हे बीड भाजप शहराध्यक्ष होते. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. तसेच त्यानंतर या भाजपने त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट होतं. तर कुटुंबीयांनी यावेळी पिस्तूल साफ करताना मिस फायर झाल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंबाबत अनेक चर्चांना उधाण आलं होतं.