शरद पवारांनी हुकूमशहाप्रमाणे पक्ष चालवला? जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत भावूक…

शरद पवारांनी हुकूमशहाप्रमाणे पक्ष चालवला? जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत भावूक…

Jitendra Awhad Nn Ajitdada Group : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह कुणाचे? या मुद्यावर शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे (Election Commission)पहिली सुनावणी झाली. त्याबद्दल आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी माहिती दिली. यावेळी आव्हाड म्हणाले की, यांनी अजितदादा गटाकडून (Ajitdada Group)आजपर्यंत पवारसाहेब आमचे दैवत, विठ्ठल असं म्हणाले अन् आयोगासमोर त्यांना हुकूमशहा असल्याचा आरोप केला. पवारसाहेब पक्ष एका संस्थानिकासारखे चालवायचे, यावेळी त्या ठिकाणी शरद पवार यांच्यासह विविध नेते उपस्थित होते, पत्रकार परिषद सुरु असतानाच आमदार जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचे दिसून आले. त्याचवेळी आव्हाडांचे डोळेही पानावल्याचे पाहायला मिळाले.

Chhagan Bhujbal : ..तरच अजितदादा CM होतील; भुजबळांनी सांगितलं आमदारांच्या संख्येचं गणित

यावेळी आव्हाड (Jitendra Awhad)म्हणाले की, कालपर्यंत मी समजायचो की, अजितदादा गटातील सर्वांचं दैवत शरद पवार हेच आहेत. पण राजकीय कारणांसाठी बाजूला गेलेत, पण काल त्यांचा वकील म्हणाला की, शरद पवार एका संस्थानिकासारखे पक्ष चालवायचे.

IND vs IRAN Kabaddi : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतच कबड्डीचा बादशहा! इराणचा पराभव करत सुवर्ण कामगिरी…

शरद पवार हे हुकूमशहासारखे वागले. ते कधीच पक्षामध्ये लोकशाही पद्धतीप्रमाणे वागले नाहीत. कालपर्यंत विठ्ठल म्हणत होते, दैवत म्हणत होते, मग पवारसाहेब हुकूमशहा आहेत, असं कसं काय म्हणू शकले? असा सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला केला आहे.

शरद पवार हे लोकशाही न मानणारे आहेत, असं तुमचे वकील कसं काय म्हणू शकले? शरद पवार दोन तास निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठी बसून होते, ते ऐकत होते. पवारसाहेब बोलून दाखवत नसतील पण त्यांनाही कुठेतरी एक भावनिक हल्ला झाल्यासारखं वाटलं असेल. ज्या माणसाने आयुष्यभर लोकशाही मुल्ल्यांचा आदर केला. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकतासभरही त्या घरात कधी राहिले नाहीत.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, त्यांच्या वकिलांचे बोलणे ऐकून कशाला लढतोय असं वाटलं. हे घरात बसल्यानंतर त्यांना फोन येणार तुम्हाला मंत्री बनवलंय, शपथविधी करा. या सगळ्या भावनिक स्वातंत्र्याचं काय फळ मिळालं तर ते हुकूमशाह आहेत? महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीनं सांगावं, शरद पवार हुकुमशाहसारखे वागतात आणि त्यांनी पक्षात लोकशाही जिवंत ठेवली नाही.

एवढेच होते तर तुम्ही सांगून जायचं होतं, तुम्ही लोकशाहीवादी नाही, आम्हाला तुमच्या पक्षात राहायचं नाही. आम्ही स्वतंत्र पक्ष काढतो. त्यांच्या हातातील बाळ आता मोठं झालंय. वाढण्याचा प्रयत्न करतंय त्याचं वृक्ष झालंय. ते आता तुम्ही त्यांच्या हातातून उपटून घेण्याचा प्रयत्न करताय असा आरोप यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube