Jitendra Awhad : घरचा आहेर, कटू आहे पण सत्य आहे असं कॅप्शन देत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांकडून (Jitendra Awhad) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलायं. सध्या राज्य सरकारकडून अनेक घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच या घोषणा केल्या जात असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय. आपल्या एक्स अकाऊंटवर त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलायं.
घरचा आहेर
कटू आहे पण सत्य आहे
निवडणुका डोळ्या समोर ठेऊन योजना लागू कारणे….म्हणजे राज्याचे नुकसान कारणे असे गडकरी साहेब म्हणता आहेत pic.twitter.com/MIYa5WD3Wy— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 18, 2024
पावसाळी अधिवेशनादरम्यान, शिंदे सरकारकडून अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेषत: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केल्याचं दिसून आलं होतं. आता शिंदे सरकारने राज्यातील युवकांसाठी ‘मुख्यमंत्री युवक प्रशिक्षण’ योजनेची घोषणा केलीयं. याच घोषणांच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी नितीन गडकरींचा जुना व्हिडिओ पोस्ट केलायं.
मोठी बातमी! उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात, दिब्रुगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
नितीन गडकरी यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिलेला हा व्हिडिओ असून व्हिडिओमध्ये गडकरी म्हणतात, देशातली वीज मंडळं 18 लाख कोटींच्या तोट्यात आहेत. देशातील सरकारांमध्ये अशाच प्रकारे वीज मोफत देण्याची स्पर्धा राहिली, तर देशातील वीज उत्पादन संपून जाईल. देशात मिक्सर वाटणं, इटली पात्र, वाटणं, इटल्या वाटणं वगैरे होताना दिसत असल्याचं नितीन गडकरी यांनी व्हिडिओत स्पष्ट केलयं.
सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून घोषणांचा पाऊस पाडला जात आहे.