Prajakt Tanpure : तुमचं सरकार दीडचं महिने, त्यामुळे चांगला राज्यकारभार चालवायला शिका, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेत खडसावलंय. दरम्यान, राज्य सरकारच्या योजनांमुळे शाळकरी मुलांना वेळेवर एसटी बस मिळत नसल्याने पर्यायी विद्यार्थ्यांनी रिक्षाने शाळेत जावं लागत असल्याचा प्रकार राहुरी विधानसभा मतदारसंघात घडलायं. या प्रकारावरुन शाळकरी मुलांसोबत चर्चा करुन तनपुरे यांनी सरकारला धारेवर धरलंय.
Video: विरोधकांना राजकारण कशाचं कराव याचं भान नाही; मेट्रो उद्घाटनावरून मोहळांचा विरोधकांवर वार
पुढे बोलताना तनपुरे म्हणाले, राज्यात निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे सत्ताधारी शिंदे सरकार राजकीय फायद्यासाठी आणि योजनांची प्रसिद्धी करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस वापरत आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी बसेस उपलब्ध नाहीत, पर्यायी विद्यार्थ्यांना रिक्षाने प्रवास करुन शाळेत यावे लागत आहे. राज्य सरकार बसेस लाडकी बहीण योजनेसाठी वापरत आहेत. लाडक्या बहीणींनादेखील बळजबरीने सकाळी 6 वाजताच घेऊन जाण्याचा घाट सरकारने घातला असल्याची खोचक टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलीयं.
भाजपला मोठा धक्का! निवडणुकीआधीच बड्या नेत्याचा राजीनामा?, बैठकांनाही दांडी
तसेच स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी राज्याला वेठीस धरण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच सुरु असून शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी एसटी बस नाही आणि स्वत:ची पाठ थोपटवण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी महिलांना बळजबरीने घेऊन जावं लागत आहे, महिलांना असं वाटतं की नाही गेलो तर आपल्याला योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे महिला जात आहेत. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, सगळेच कामाला लावलेले आहेत.
एक आमदार असलेल्या पक्षालाही CM व्हायला आवडेल…; अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचे भाष्य
सगळ्यांनी कामधंदे सोडून सभेला जाण्याचे धंदे यांनी लावलेले आहेत, त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बस्स करा. मागील काळातदेखील शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी राज्यातील जनतेला वेठीस धरलं जात होतं, बंद करा आणि चांगल्या पद्धतीने राज्यकारभार चालवायला शिका तसंही तुम्ही दीडच महिना सरकारमध्ये असणार आहेत.