एक आमदार असलेल्या पक्षालाही CM व्हायला आवडेल…; अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचे भाष्य
Devendra Fadnavis On Ajit Pawar : अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) येऊन ठेपल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपाचाच्या चर्चा सुरू आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं होतं. मुख्यमंत्री व्हायची माझी इच्छा आहे, असं ते म्हणाले होते. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं.
शिवस्वराज्य यात्रा! महाराष्ट्राचा एकच नारा गद्दारांना नाही थारा
एक आमदार असलेल्या पक्षालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी मोजकी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली.
इंडिया टुडे या वृत्तवाहिनीच्या कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, ज्या पक्षाचा एक आमदार आहे, त्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. पुढं ते म्हणाले की, लोकसभेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मतं आम्हाला जास्त मिळाली. त्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं आम्हाला कमी मिळाली, असंही फडणवीस म्हणाले.
YouTuber Elvish Yadav : ईडीची मोठी कारवाई, यूट्यूबर एल्विश यादवची मालमत्ता जप्त
महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होईल? असा सवाल फडणवीसांना विचारलं असता ते म्हणाले की, याचे उत्तर देण्याची क्षमता माझ्यात नाही. अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते त्यांच्या पक्षाची बाजू मांडू शकतात, पण मी महाराष्ट्र भाजपचा नेता आहे. आमच्या पक्षात मुख्यमंत्री कोण होणार? त्याचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेते, असं फडणवीस म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी घटते कमी होते, हा इतिहास आहे. हा ट्रेंड असाच चालू राहिला तर अभिमन्यू अडचणीत येईल का? या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष असेल आणि महायुती सर्वात मोठी आघाडी म्हणून अस्तित्वात येईल. महायुती पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
मी आधुनिक अभिमन्यू आहे
उद्धव ठाकरेंसोबतच्या राजकीय संबंधांवरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला संपवण्याची भाषा केली. पण जनतेशिवाय कोणीही कोणाला संपवू शकत नहाी. तेही राहतील आणि मी राहीन. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी लोकांचा आशीर्वाद असेपर्यंत मला संपवता येणार नाही, मी आधुनिक अभिमन्यू आहे. मला चक्रव्यूह तोडता येतं, असं फडणवीस म्हणाले.
अजितदादा नेमकं काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंडिया टुडेच्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली होती. मलाही वाटतं की, मुख्यमंत्री व्हावं. पण माझी गाडी उपमुख्यमंत्रीपदावरच अडकली आहे. मी पूर्ण प्रयत्न करतोय की गाडी पुढं जावी, पण संधी मिळत नाही. 2004 साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्री होण्याची संधी होती, पण पक्ष नेतृत्वाने ती संधी गमावली, असं अजित पवार म्हणाले होते.