“अजित पवार महायुतीतून बाहेर येतील अन्..” बच्चू कडूंच्या वक्तव्याने खळबळ!
Bacchu Kadu on Ajit Pawar : राज्यात महायुतीचं सरकार आहे. या सरकारमध्ये अजित पवार राष्ट्रवादी (Ajit Pawar) काँग्रेस पक्ष फोडून सहभागी झाले आहेत. आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. मात्र त्याआधीच महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. अजित पवार महायुतीत नाराज आहेत अशा चर्चा सातत्याने होत आहेत. मध्यंतरी तशा काही घटनाही घडल्या होत्या त्यावरूनही अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील असा अंदाज बांधला जात आहे. या घडामोडीतच प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
काय म्हणाले बच्चू कडू?
सध्या अशी अनेक चिन्ह दिसत आहे की अजित पवार महायुतीतून बाहेर येतील. किंबहुना ते आमच्यात येतील आणि मोठी महाशक्ती तयार होईल. अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तरच त्यांना त्यांची जागा मिळेल अन्यथा मिळणार नाही. आगामी काळात सगळ्या आघाड्या आणि युतीत फाटाफूट होईल असे दिसत आहे. आघाडी आणि युतीतून बाहेर पडलेल्या नेत्यांना आमच्या आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय सुकाणू समिती घेईल. अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील असे काही संकेत मिळत आहेत. जशी तुमची सूत्रे असतात तशी आमचीही असतात असे बच्चू कडू पत्रकारांना उद्देशून म्हणाले.
अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील…; आमदार बच्चू कडूंचे मोठे विधान
लोकसभेत खराब कामगिरी, महायुतीतून गच्छंती ?
लोकसभा निवडणुकीत महायुतीत तीन पक्ष एकत्र होते. या निवडणुकीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कामगिरी अतिशय खराब राहिली. भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एक जागा जिंकता आली. त्यांच्या या कामगिरीवर नाराजी व्यक्त करण्यात आली. अजित पवार यांना सोबत घेऊन काहीच फायदा झाला. अजित पवार आमदरांना सोबत घेऊन आले पण त्यांना मते आणता आली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार आजही शरद पवारांच्याच पाठीशी उभा असल्यचे लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. अजित पवार गटाकडून 70 ते 80 जागांची मागणी केली जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांच्या वक्तव्यांवर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत अजित पवार आता लवकरच महायुतीतून बाहेर पडतील अशा चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहेत.
Ajit Pawar: ..आता विधानसभेला दादांना पाडायचंय का?, गब्बरच्या ‘त्या’ पत्रामुळे बारामतीत खळबळ