Download App

अजितदादा मित्र मंडळ SC चा निर्णय बदलणार का? ‘चिन्हा’च्या वापरावर रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar On Ajit Pawar Group : अजित पवार (Ajit Pawar) मित्र मंडळ आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलणार का? असा खडा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटद्वारे केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्हाच्याखाली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार एक नोट लिहिलं अनिर्वार्य असतानाही अजित पवार गटाकडून या निर्णयाची पायमल्ली होताना दिसत आहे. त्यावरुनच रोहित पवार यांनी ट्विट करीत अजितदादा गटावर निशाणा साधला आहे.

रोहित पवार पोस्टमध्ये म्हणाले, “अजितदादा मित्र मंडळाने घड्याळ चिन्ह वापरताना या डिझाईनमध्ये ‘न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात’ अशी अट ठळकपणे लिहिणं आवश्यक होतं… मात्र ते न लिहिणं म्हणजे न्यायालयाचा अवमान आहेच पण न्यायालयाच्या निर्णयाला न जुमानण्याची भाजपसारखी मुजोरीही यातून दिसते..

आता ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाच्या निवडीच्या प्रक्रियेतून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना बाहेर काढण्यासाठी भाजपने संसदेत कायदा केला, त्याप्रमाणे अजितदादा मित्र मंडळ रायगडच्या एका खासदाराच्या ‘प्रचंड बहुमता’च्या बळावर संसदेत कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचा कालचा निर्णय बदलतं की काय, हेच पहायचंय!” असं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ऐन निवडणुकीत ज्योती मेटेंची अडचण… शासकीय नोकरीचा राजीनामा सरकारकडून ‘वेटिंगवर’

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्हाबाबत शरद पवार गटाला काही अटी घालून दिल्या आहेत. निवडणूक आयोगने अजित पवार गटाला देखील महत्त्वाचे असे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले घड्याळ हे जरी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले असले तरी यासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यामुळेच अजित पवार गटाने यापुढे घड्याळ चिन्ह वापरत असताना प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी तसा उल्लेख करावा असे सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानूसार अजित पवार गट कोणत्याही सभेत, जाहिरातीत, व्हिडिओमध्ये घड्याळ चिन्ह वापरले तेव्हा तेव्हा त्यांना घड्याळ चिन्हाचा वापर करण्या संदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, अशी नोट लिहावी लागणार आहे. ही नोट सर्वांना दिसेल अशा पद्धतीने लिहले पाहिजे असे देखील न्यायालयाने म्हटले.

follow us