Download App

Rohit Pawar : तरीही अजितदादांचे सहकारी गप्प का? रोहित पवारांना वेगळाच संशय

Rohit Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या जहरी टीकेचे पडसाद राज्यभरात उमटले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी पडळकरांवर जोरदार टीका केलीच पण सत्तेतील भाजप नेत्यांनीही पडळकरांचे कान टोचले. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडळकरांना खडेबोल सुनावले. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Politics : सुळेंचे भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आव्हान, तटकरेंनी थेट निकालच सांगितला

भाजपमधील काही भौतिक क्षमता नसलेले नेते खालच्या पातळीवर नेहमी टीका करतात. अजितदादा सरकारमध्ये असतानाही त्यांच्यावर काही चॉकलेट नेते खालच्या पातळीवरील वक्तव्ये करत आहेत. मात्र, त्यानंतरही अजितदादांना मानणारे नेते आणि त्यांच्याबद्दल मोठमोठी भाषणे करणारे इतर नेते शांत असल्याबद्दल आश्चर्य वाटतं, असे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी यामध्ये कुणाचेही नाव घेतले नाही. त्यामुळे आता हे नेते कोण आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज जरी या प्रश्नाचे उत्तर दिसत नसले तरी आगामी काळात याचे उत्तर नक्कीच मिळेल.

काय म्हणाले होते पडळकर ?

त्यांची (अजित पवार) भावना आमच्याबद्दल स्वच्छ नाही. त्यामुळं त्यांना पत्र देण्याची गरज नाही. लबाड लांडग्याचं पिल्लू आहे ते. त्यामुळं त्यांना आम्ही मानत नाही. म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलं नाही आणि यापुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळतो त्या दोघांना मी पत्र दिलं आहे, असे पडळकर म्हणाले होते.

फडणवीस, विखेंनीही टोचले कान

गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीच आहे. तिन्ही पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये असं माझं मत आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पडळकरांना मोलाचा सल्ला दिला होता. पडळकरांनी स्वतःला आवर घालावा. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक दिवसांपासूनचा आहे. ते एकमेकांविरोधात निवडणुकीत उभे होते. आपण आता एकत्र असल्याने त्यांनी विधान करताना स्वतःला आवर घालावा. सरकारच्या स्थिरतेसाठी आपसातले मतभेद बाजूला ठेवावेत, असे विखे पाटील म्हणाले होते.

भाजपचा हा एक नवीन जुमला ! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सडकून टीका

follow us