Download App

होय, मला अजितदादांनीच तिकीट दिलं; रोहित पवारांनी सांगितला ‘आमदारकी’चा किस्सा

होय, मला अजितदादांनीच तिकीट दिलं होतं, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. लेट्सअप चर्चा कार्यक्रमात त्यांनी मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.

Image Credit: Letsupp

Rohit Pawar On Ajit Pawar : होय, मला अजितदादांनीच (Ajit Pawar) तिकीट दिलं होतं, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी केलायं. आमदार रोहित पवार यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्यापासून केलीयं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अजितदादांनी आपल्याला मदत केली असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं आहे. दरम्यान, लेटस्अप मराठीच्या लेट्सअप चर्चा या कार्यक्रमात रोहितदादांनी मुलाखत दिली. यावेळी बोलताना रोहितदादांनी अजितदादांच्या दाव्यांवर थेटपणे बोलले आहेत.

श्रींमत भाऊसाहेब रंगारी गणपतीला मोगर्‍यांची आरस; भाविकांची बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर (Ncp Crisis) अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात संघर्ष होत असल्याचं दिसून येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, अजिदादांकडून रोहित पवारांवर जोरदार टीका तर कधी खिल्ली उडवल्याचं दिसून आलं. या टीकांवर रोहित पवारही मागे राहिल्याचं दिसून आले नाहीत, त्यांनीही अजितदादांना सडेतोडपणे उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं होतं. रोहित पवारांना कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत मीच सांगितलं असल्याचा दावा अजितदादांनी केला. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, मला अजितदादांनीच तिकीट दिलं असून उमेदवारांना तिकीट देण्याची महत्वपूर्ण जबाबदारी शरद पवार यांनी अजित पवार यांनाच दिली होती. त्यामुळे अजितदादांनी मला तिकीट दिलं असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Video : विधानसभेतही खटपट होणारच; भुजबळांच्या मागणीवर फडणवीसांनी दिलं उत्तर

तसेच जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून मी विधानसभेची तयारी करीत होतो, मला ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे, त्या मतदारसंघात मी दोन वर्षांपासून तयारी करीत होता. अजितदादा तुम्ही उगाचच माझ्या सासुरवाडीचं नाव घेऊ नका, माझ्या कुठल्याही राजकीय निर्णयात सासुरवाडीचे लोकं नसतात, असा सज्जड दम यावेळी बोलताना रोहित पवार यांनी भरलायं. दरम्यान, रोहित पवार हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते, तिकडं त्यांची सासुरवाडी होती म्हणून, पण मी त्यांना सांगितलं की कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवं, असा दावा अनेकदा अजित पवार यांनी केला होता. अखेर त्यावरुन रोहित पवार यांनी अजितदादांना चांगलच सुनावलं आहे.

ईडीच्या कारवाईमागे अजितदादाच :
कारखान्यावर छापे पडले. अनेक कारवायांना सामोरे जावं लागलं. याच्यामागे जे कोणी आहेत, त्या व्यक्तीचे नाव मी योग्य वेळ घेईल. 4 जून नंतर त्या व्यक्तीचे नाव मी सांगतो. मात्र लोकांना अंदाज आलेला आहे. कारण माझ्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाई मागे अजितदादा किंवा त्यांच्याच परिवारातील कोणीतरी आहे. तसेच त्यांना मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस असल्याचा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केलायं.

follow us

वेब स्टोरीज