Prafulla Patel News : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. विधानसभा निवडणुकीसाठी (Assemly Election) सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा रंगली होती. अखेर राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी या चर्चेला पुर्णविराम दिलायं. अजित पवार बारामतीतूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केलीयं.
8 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी अभिनेत्याची एंट्री, आगामी सिनेमाच्या शूटिंगलाही सुरुवात
राज्यात जुलै 2023 मध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या होत्या. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान, बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उभे करणे ही चूक असल्याचं मान्य केलं होतं. तसेच बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याचंही अजितदादांनी सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवार बारामतीत निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
जॉन अब्राहम-शर्वरीचा ‘वेदा’ सिनेमा OTT रिलीजसाठी सज्ज! या दिवशी, या ठिकाणी पाहता येणार
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत. मी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा करीत आहे. यामध्ये कुठलाही संभ्रम ठेऊ नका, मी ही जागा अधिकृतपणे घोषित करीत आहे. बारामतीत दुसरं तिसरं कोणीही उभं राहणार नाही. अजित पवारचं बारामतीचे उमेदवार राहणार असल्याचं पटेल यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
दरम्यान, अजित पवार हे बारामतीतूनच लढले पाहिजे अशी भूमिका कार्यकर्त्यांची आहे, त्यासाठी बारामतीत आज आंदोलनही झाल्याचं पाहण्यास मिळालं. यानंतर आता बारामतीत नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल.