हार्वेस्टर, पीकविमा अन् बोगस बिलं, तुम्ही नैतिकतेवर राजीनामा द्याच; सुळेंनी मुंडेंना सुनावलं!

हार्वेस्टर, पीकविमा अन् बोगस बिलं, तुम्ही नैतिकतेवर राजीनामा द्याच, या शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री धनंजय मुंडेंना सुनावलंय.

Supriya Sule

Supriya Sule

Supriya Sule : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप केले जात आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पालकमंत्रिपदावर असताना धनंजय मुंडेंनी तब्बल 73 कोटींची बिले उचलल्याचा आरोप केलायं. तर आधीच्या काळात हार्वेस्टर, पीकविमा घोटाळ्याचाही धनंजय मुंडेंवर आरोप करण्यात आला. या संपूर्ण आरोपांनंतर आता धनंजय मुंडे यांनी नैतिकतेवर राजीनामा द्यावाच, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री मुंडेंना सुनावलंय.

“खबरदार, कुणी खंडणी मागितली तर..”, बीडमध्ये दाखल होताच अजितदादांनी ठणकावलं!

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, बीडमध्ये हार्वेस्टर, पीकविम्याचा घोटाळा आहे, या घोटाळ्याबाबची कबुली कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलीयं. हा घोटाळा आधीच्या काळात झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या घोटाळ्याची संपूर्ण माहिती राज्य सरकारकडे आहे, त्यांचं पुढं काय झालं याबाबत सरकारने उत्तर द्यायला हवं, कालच आमदार धस यांनी बोगस बिलांबाबत सांगितलं आहे, त्यामुळे आता त्यांनी नैतिकतेवर राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी सुळे यांनी केलीयं.

‘मराठ्यांविषयी द्वेष, तुम्हाला सोडणार नाही, मी खानदानी औलाद’, जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

तसेच संतोष देशमुख खून प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या 51 दिवसांपासून फरार आहे. तो कुठे आहे, त्याचा तपास काय याचं उत्तर राज्य सरकारने द्यायला हवं. यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे कागदोपत्रे दिली आहे, त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र, आम्ही सर्व राष्ट्रवादीचे खासदार भ्रष्टाचार, दादागिरी, हफ्तेखोरीच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री अमित शाहा यांची भेट घेणार असून संसदेत बजेटमध्ये मोठ्या ताकदीने विषय मांडणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय.

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांनतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर नमिता मुंदडा, खासदार बजरंग सोनावणए यांनी डीपीडीसी बैठकीत बोगस बिलाचा मुद्दा मांडावा, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटंलय.

Exit mobile version