वाल्मिक कराडच्या मदतीसाठी पोलिसांकडून बनावट अटक; आमदार सुरेश धस यांचा मोठा गौप्यस्फोट

  • Written By: Published:
वाल्मिक कराडच्या मदतीसाठी पोलिसांकडून बनावट अटक; आमदार सुरेश धस यांचा मोठा गौप्यस्फोट

Santosh Deshmukh Murder Case : भाजप आमदार सुरेश धस यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. बीडच्या पोलिसांवर कितीही टीका झाली तरी त्यांचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. (Santosh Deshmukh ) जे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांची वाल्मिक कराडसोबत कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. वाल्मिक कराड सध्या मकोका प्रकरणात न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. मात्र त्याच्या सेवेसाठी बीडचे पोलिस काही बनावट लोकांना अटक करुन जेलमध्ये पाठवत आहेत असा खळबळजनक खुलासा धस यांनी केला आहे.

काय म्हणाले सुरेश धस?

आरोपींकडून पोलिसांना सहकार्य होत नाही. पुरावे लपवण्याचं काम आरोपी करीत आहेत. एसआयटी चांगलं काम करीत आहे, त्यांच्या कामावर आमचं समाधान आहे. मात्र बीडमध्ये जे पोलिस अधिकारी आकासाठी काम करतात, त्यांची लिस्ट मी मुख्यमंत्र्यांकडे मंगळवारी देणार आहे.

वाल्मिक कराडच्या संपत्तीतून अनेक धागेदोरे हाती येणार, आ. धसांच्या सूचक वक्तव्यानं खळबळ!

धस पुढे म्हणाले की, पोलिस खात्यामध्ये हे बल्लाळ वगैरे जे लोक आहेत, त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात. आकाची सेवा करायला काही लोकांना जाणीवपूर्वक अटक केली जात आहे, पोलिस लोक आयडिया करतात, हे आम्हाल कळत नाही का? आकाचे पाय चेपायला माणसं पाठवली जात आहेत.

घुलेला पाच दिवसांची कोठडी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला पुन्हा पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेल्या मोबाइलचा फॉरेन्सिक डेटा शोधण्यासाठी व दुसऱ्या मोबाइलचे लॉक उघडण्यासाठी त्याच्या कोठडीची मागणी सीआयडीकडून विशेष मकोका न्यायालयाकडे सोमवारी (ता. २७) करण्यात आली होती. न्यायालयाने सुदर्शनला शुक्रवारपर्यंत (ता. ३१) कोठडी सुनावली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube