Download App

‘कॅबिनेटमध्ये चर्चेऐवजी गॅंगवॉरच’; सुप्रिया सुळेंचा घणाघात

Supriya Sule : कॅबिनेटमध्ये चर्चेऐवजी गॅंगवॉरच भरलेलं असत, असा घणाघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. दरम्यान, पुण्यात आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर खासदार सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत असताना देशातील आणि राज्यातील विविध मुद्द्यांवरुन त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मनोज जरांगेंची तब्येत पुन्हा बिघडली; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आधीच्या सरकारपेक्षा आताच्या सरकारने काही वेगळं केलं नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत चर्चेऐवजी गँगवॅारच भरलेलं असल्याचा घणाघात सुप्रिया सुळेंनी केला आहे. येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेवरुन सुळेंना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर आम्हाला निमंत्रणच मिळालं नसल्याचं सुळेंनी सांगितलं आहे.

‘यूपी-बिहारचे लोक तामिळनाडूत टॉयलेट साफ करतात’; द्रमुकच्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

ड्रग्ज प्रकरणाचं पुढं काय…रात गयी बात गयी…
राज्यात ड्रग्ज प्रकरण उघडकीस झालं. ड्रग्जमाफिया सापडला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सगळंच एक्सपोझ करणार असल्याचं सांगितलं होतं. या प्रकरणी आम्ही फडणवीसांना पाठिंबा देणार असल्याचंही जाहीर केलं होतं. मात्र, चौकशीचं पुढं काय झालं… रात गयी बात गयी…. असं म्हणत सुळेंनी फडणवीसांवर टीका केली आहे. हा विषय असा अर्धवट सोडून चालणार नसल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

तेलंगणातील विजयाची माणिकराव ठाकरेंना बक्षीशी, तब्बल तीन राज्यांच्या प्रभारीपदांची जबाबदारी

संसदेत घुसखोरांना हल्ला केला त्यात हल्लेखोरांकडे स्फोटक, धुरामध्ये विषाक्त, किंवा आत्मघातकी हल्ला केला असता तर संसदेत उपस्थित असलेल्या 500 खासदारांचा कार्यक्रमच आटोपला असता, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी बोलताना सुळे यांनी ज्या दिवशी संसदेत घुसखोरी झाली तेव्हाची सत्य परिस्थितीच सांगितली आहे.

मला अभिमान वाटतो एका गोष्टीचा संसदेवर धूर सोडण्यात आला तेव्हा सर्व खासदारांनी राजकारण बाजूला सारुन स्वत:ला वाचवलं. त्या दिवशी संसदेत सुनिल तटकरे होते की नाही हे मला माहित नाही. पण त्या दिवशी संसदेत आतमध्ये एकही पोलिस नव्हता. घुसखोरांनी हल्ला केला तेव्हा सर्व खासदारांनी मिळून घुसखोराला पकडलं, असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

Tags

follow us